Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबईतील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; मध्य रेल्वेने 14 एसी लोकल गाड्यांचे वेळापत्रक केले जाहीर

Mumbai Local Train News : मुंबई शहराची जीवनवाहिणी अशी ओळख असलेल्या लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला आहे. मुंबईच्या उपनगरीय भागात राहणारे लोक इतर कोणत्याही वाहतुकीच्या साधनांपेक्षा लोकल ट्रेनलाच पसंदी देतात. पण मुंबईच्या कडक उन्हात लोकल ट्रेनमधून प्रवास करणे त्रासदायी ठरते. यावर आता मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

16 एप्रिलपासून होणार वेळापत्रकात बदल

मिळालेल्या माहितीनुसार, दररोज लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने (CR) एसी लोकल ट्रेन सुरू केल्या आहेत. त्याचक्रमाने, मध्य रेल्वेने 16 एप्रिल (बुधवार) पासून मुंबईहून सुटणाऱ्या 14 नवीन एसी लोकल गाड्यांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. चला तर जाणून घेऊया, ते वेळापत्रक अन् कोणती गाडी कुठून किती वाजता सुटणार..!

Mumbai Local Train News

लोकल गाड्यांची संख्या 66 वरुन 80 होणार

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 16 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या 14 नवीन एसी लोकल ट्रेन्स त्याच मार्गावर आधीच धावणाऱ्या नॉन-एसी ट्रेन्सची जागा घेतील. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी ही माहिती दिली आहे. या नवीन एसी लोकल गाड्यांमुळे एकूण एसी लोकल गाड्यांची संख्या 66 वरून 80 होणार आहे. रेल्वे प्रवाशांना या कडक उन्हात एसी लोकल ट्रेन मिळतील की नॉन-एसी ट्रेनमध्ये प्रवास करावा लागेल याची चिंता करण्याची गरज नाही. एसी लोकल ट्रेनची संख्या वाढल्याने प्रवास करणे निश्चितच पूर्वीपेक्षा सोपे आणि आनंददायी होईल.

मुंबई आणि ठाण्याहून सुटणाऱ्या 14 एसी लोकल ट्रेनचे वेळापत्रक

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) - बदलापूर : सीएसएमटीहून रात्री ९.०८ वाजता सुटतील आणि रात्री उशिरा १०.५६ वाजता बदलापूरला पोहोचतील.
  • सीएसएमटी ते ठाणे : ४ लोकल ट्रेन धावतील - सीएसएमटीहून दुपारी १२.२४, दुपारी २.२९, दुपारी ४.३८ आणि संध्याकाळी ६.४५ वाजता सुटतील.
  • ठाणे स्थानकात अनुक्रमे दुपारी १.२०, दुपारी ३.२५, दुपारी ५.३५ आणि उशिरा ७.४२ वाजता पोहोचतील.
  • सीएसएमटी - बदलापूर: सीएसएमटीहून सकाळी ९.०९ वाजता निघेल आणि बदलापूरला सकाळी १०.३२ वाजता पोहोचेल.
  • विद्याविहार - कल्याण: ही गाडी विद्याविहारहून सकाळी ६.२६ वाजता निघेल आणि कल्याणला सकाळी ७.२५ वाजता पोहोचेल.
  • कल्याण - सीएसएमटी: कल्याणहून सकाळी ७.३४ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला सकाळी ९.०५ वाजता पोहोचेल.
  • बदलापूर - सीएसएमटी: बदलापूरहून सकाळी १०.४२ वाजता निघेल आणि दुपारी १२.१२ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+