Mumbai Local Train News : हार्बर मार्गावरही धावणार आता वातानुकूलित लोकल; प्रवाशांना दिलासा
Mumbai Local Train News : मुंबईतील विविध भागातून लोकल प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठी व आनंदाची बातमी देण्यात आली आहे. प्रामुख्याने हार्बर मार्गावरील सामान्य लोकल फेरी रद्द करून या वेळेत वातानुकूलित लोकल फेरी चालवण्यात येणार आहे.
वाढत्या उन्हामुळे रेल्वे प्रशासनाकडून हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रवाशांची चांगली सोय व्हावी व उन्हापासून त्यांना दिलासा मिळावा, यासाठी सुमारे 14 वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबईहून मुंबईमध्ये दाखल होणाऱ्या प्रवाशांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम आणि मध्य रेल्वेनंतर आता हार्बर मार्गावर देखील वातानुकूलित लोकल धावणार आहे. हार्बर मार्गावरील सामान्य लोकल फेरी रद्द करून या वेळेत वातानुकूलित लोकल फेरी चालवली जाणार आहे. या मार्गावर सुमारे 14 वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले. त्यामुळे नवी मुंबईहून मुंबईमध्ये दाखल होणाऱ्या प्रवाशांना थंडगार प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ
उन्हाळा सुरू झाल्यापासून मुंबईत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्यामुळे प्रवाशांना गर्दीच्यावेळी धक्काबुक्की आणि घामाच्या धारांसोबत प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसौय होते. परंत, आता या त्रासापासून प्रवाशांना सुटका मिळावी, म्हणून रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतला.
यापूर्वी मध्य रेलेने नुकत्याच सेंट्रल लाईनवर वातानुकूलित लोकलच्या 14 फेऱ्या वाढविल्या आहेत. त्यानंतर आता हार्बर मार्गावर देखील वातानुकूलित लोकल सुरू करण्याची तयारी देखील सुरू केली. नुकतीच मध्य रेल्वेच्या ताफ्यात एक वातानुकूलित लोकल दाखल झाली असून ती हार्बर मार्गावर चालवली जाईल, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
हार्बर मार्गावर 14 वातानुकूलित लोकल फेऱ्या?
हार्बर मार्गावरील सामान्य लोकल फेरी रद्द करून या वेळेत वातानुकूलित लोकल फेरी चालवण्यात येणार आहे. या मार्गावर सुमारे 14 वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने सीएसएमटी- पनवेल, वाशी - वडाळा, वडाळा पनवेल, पनवेल - सीएसएमटी अशा धावणार आहेत. यामधील 7 लोकल अप आणि 7 डाऊन मार्गावर धावणार आहेत. सकाळच्या गर्दीच्या वेळी एक फेरी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी दोन फेऱ्या धावतील, असे नियोजन केले जाणार आहे.












Click it and Unblock the Notifications