Mumbai Local Tran : खूशखबर! लोकल ट्रेनच्या ऑटोमॅटिक दरवाजाची ट्रायल यशस्वी; कधीपासून सेवा सुरु होणार
Mumbai Local Train Automatic Doors Trial Successful : मुंबईकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! मुंबईचा श्वास असलेल्या लोकल ट्रेनमध्ये लवकरच स्वयंचलित (ऑटोमॅटिक) दरवाजे (गेट्स) बसवले जाणार आहेत. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे मोठे पाऊल मानले जात आहे. यासंदर्भात वनइंडिया हिंदीने वृत्त दिले आहे. अलिकडेच रेल्वेतून पडून मुंबईत लोकल मार्गावर दुर्घटना घडली होती, त्या धर्तीवर ही उपाययोजना राबवली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लोकल ट्रेनला स्वंयचलीत दरवाजे लावण्यासंदर्भात वक्तव्य केले होते.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच घोषणा केली होती की, या वर्षी डिसेंबर २०२५ पासून मुंबईला बंद दरवाजा असलेल्या लोकल ट्रेन्स मिळण्यास सुरुवात होईल. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये या ऑटोमॅटिक गेट्स असलेल्या ट्रेन्सचा ट्रायल (चाचणी) यशस्वीरित्या सुरू झाला आहे.
ट्रायल यशस्वी, डिसेंबर २०२५ पासून सेवा सुरू
रेल्वेने या ट्रायलचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्त महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या उपस्थितीत स्वयंचलित दरवाजांची ही चाचणी घेण्यात आली.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांच्या सुरक्षेवर विशेष भर देत सांगितले की, "मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचे आहे की, मुंबईत धावणाऱ्या कोणत्याही लोकल ट्रेनचे दरवाजे बंद असावेत."
नवीन गाड्या बंद दरवाजांसह येणार
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की, भविष्यात मुंबईसाठी तयार होणाऱ्या सर्व ट्रेन्स बंद दरवाजांच्या (Closed Doors) असणार आहेत.
- AC आणि नॉन-AC दोन्ही ट्रेन्समध्ये ऑटोमॅटिक दरवाजे
- सर्व विद्यमान (Existing) लोकल ट्रेन्समध्ये हे दरवाजे 'रेट्रोफिट' (जुने बदलून नवीन बसवणे) केले जातील.
- नॉन-एसी (Non-AC) ट्रेन्सनाही बंद दरवाजे असतील.
- नैसर्गिकरित्या, ज्या एसी (AC) ट्रेन्स नव्याने तयार होतील, त्या देखील बंद दरवाजांसहच येतील.
डिसेंबर २०२५ ची अंतिम मुदत
वैष्णव यांनी पुन्हा एकदा आश्वासन दिले आहे की, विद्यमान ट्रेन्समध्ये डिसेंबर २०२५ पर्यंत बंद दरवाजे सुनिश्चित करण्याचे काम सुरू आहे. तर २३८ एसी लोकल ट्रेन्ससाठी निविदा जारी करण्यात आली आहे. रेल्वेने आधीच २३८ एसी लोकल ट्रेन्ससाठी ही निविदा दिली होती आता, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निर्णयामुळे लोकल ट्रेनमधील दरवाज्यात उभे राहून प्रवास करणे किंवा अपघातामुळे होणारे मृत्यू टळण्यास मोठी मदत मिळणार आहे.
हेही वाचा : Mumbai local train : मुंबईकरांसाठी खूशखबर, लोकल ट्रेन आणखी फास्ट धावणार! स्पीडबाबत मोठा निर्णय
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications