मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस, राज्यातील या 9 जिल्ह्यांना ऑंरेज अलर्ट

Rain Update : मुंबई, पुण्यासह राज्यातील काही जिल्हामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. येत्या 24 तासांत कोकण आणि पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून राज्यातील 9 जिल्ह्यांसाठी ऑंरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Mumbai Rain

यामध्ये कोकणातील सिंधूदुर्ग,रायगड, ठाणे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड तर विदर्भातील गडचिरोली, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्हांचा समावेश आहे.राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला आहे.तसेच खरीप हंगामातील पिकांना या पावसाचा मोठा फायदा होत आहे.

मुंबईत आज पहाटेपासूनच मुसधार पावसाला सुरुवात झाली आहे . मुंबई, पालघर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्राला ही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस

आज पहाटेपासूनच मुंबई उपनगरांत जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. दादर, वरळी, दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे.त्यामुळे अनेक भागात पावसाचे पाणी साचले आहे कल्याण, डोंबिवली, ठाणे, बदलापुर, उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये पाऊस पडत आहे. कल्याण डोंबिवलीतील जनजीवन विस्कळीत झालं आहे.बदलापुरात मुसळधार पाऊस पडत आहे. यापार्श्वभूमीवर मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने धावत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+