Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दहिसरमध्ये इमारतीला भीषण आग! शर्थीनंतर 36 रहिवाशांची सुटका! एकाचा मृत्यू 19 जखमी, जाणून घ्या अपडेट्स

Mumbai Dahisar building fire : मुंबईतील दहिसर (पूर्व) येथील शांतीनगरमधील 'न्यू जनकल्याण सोसायटी' या निवासी इमारतीला आज सायंकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, १९ जण जखमी झाले आहेत. मुंबई अग्निशमन दलाच्या (MFB) तात्काळ बचाव कार्यामुळे ३६ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

आगीची माहिती समजताच नागरीकांसह घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान पोहचले व त्यांनी बचावकार्य केले. न्यू जनकल्याण सोसायटी, शांतीनगर, एस. व्ही. रोड, दहिसर (पूर्व) येथे ही आग लागली असून ही २३ मजली निवासी इमारत आहे.

Mumbai Dahisar building fire  36 residents rescued


फोटो - संग्रहित

काय आहे आगीचे कारण?

इमारतीच्या तळघरातून चौथ्या मजल्यापर्यंतच्या इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंग, इलेक्ट्रिक केबल्स आणि तळघरातील दोन सामान्य इलेक्ट्रिक मीटर केबिनमध्ये आग लागली. दुपारी ३:०५ वाजता आगीची माहिती मिळाली आणि सायंकाळनंतर वाजता आग पूर्णपणे विझवण्यात आली.

बचावकार्य आणि जखमींची स्थिती

अग्निशमन दलाने तात्काळ बचाव मोहीम सुरू करून इमारतीत अडकलेल्या ३६ रहिवाशांना बाहेर काढले. त्यापैकी १९ जणांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रोहित हॉस्पिटलमध्ये ७ जखमींना दाखल करण्यात आले. यातील एका महिलेचा मृत्यू झाला. एका पुरुषाची प्रकृती गंभीर असून, उर्वरित ५ जणांची प्रकृती स्थिर आहे. नॉर्दर्न केअर हॉस्पिटलमध्ये १० जखमींना दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती आणि अधिक माहितीची प्रतीक्षा आहे, तर प्रगती हॉस्पिटल येथे एका जखमीला दाखल करण्यात आले असून, त्याच्या प्रकृतीबद्दलची माहिती अद्याप मिळाली नाही.

एक जण गंभीर

शताब्दी हॉस्पिटल येथे एका जखमीला दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठी जीवितहानी टळली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+