Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मौलवीने 17 वर्षीय युवकाची केली हत्या, मृतदेहाचे तुकडे करुन गाडले, ठाण्यातील या घटनेने राज्यात खळबळ

Mumbai Crime News : ठाणे शहरात सुमारे पाच वर्षांपूर्वी झालेल्या युवकाच्या हत्येची थरारक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात एका मौलवीनेच युवकाची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून पुरून टाकले. आता पाच वर्षानंतर या खून प्रकरणाचा उलघडा झाला असून आरोपी मौलवीला पोलिसांनी अटक केली आहे. गुलाम रब्बानी शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मौलवीचे नाव आहे. तर शोएब शेख (वय 17) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

नेमकी घटना कशी व का घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी येथील नवीबस्ती नेहरूनगर परिसरातील शोएब शेख हा युवक 20 नोव्हेंबर 2020 रोजी बेपत्ता झाला होता. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी पालकांनी बेपत्ता त्यानंतर अपहरण झाल्याचा तक्रार दिली. दरम्यान कालांतराने पोलिसांना स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार परिसरात राहणारा मशिदीचा मौलवी गुलाम रब्बानी याने शोएब शेख याची हत्या केल्याचा संशय व्यक्त आहे. भिवंडी शहर पोलिसांनी 2023 मध्ये बांगी गुलाम रब्बानी यास पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणले होते. परंतु, त्यावेळी पोलिस ठाण्यात झालेल्या गर्दीचा फायदा घेत त्याने त्या ठिकाणाहून पळ काढला.

Mumbai Crime news

पोलिस खाकी दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला

ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना आरोपी गुलाब रब्बानी याच्याबाबत माहिती मिळाली. त्यांनी पथकासह आरोपीस आसाममधून अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता व त्याला खाकी दाखवतात शोएब शेख याची हत्या केल्याचे कबूल केले. त्याने हत्या का केली याविषयी देखील माहिती दिली.

मृतदेहाचे तुकडे केले, दुकानाखाली दाबले

मौलवी गुलाम रब्बानी याने पोलिसांसमोर नतमस्तक होत संपूर्ण हत्येविषयी कबुली दिली. त्याने शोएब शेखची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेहाचे तुकडे काही भाग रस्त्यालगतच्या कचऱ्यात तुकडे करून फेकून दिले. तर मुंडक अन् काही भाग त्याच्या दुकानाच्या भागात दाबून टाकले.

मृताचे काही तुकडे आढळले

त्यानंतर, स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठा पोलिस फौजफाटा तैनात करीत आरोपीस घटनास्थळी नेण्यात आले. तेथे शासकीय पंचांच्या समक्ष मृतदेहाचे काही अवशेष बाहेर काढून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहेत. दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत हत्येमागील कारण उघड होणार आहे.

मौलवीने का केली हत्या, कारणंही आलं समोर

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गुलाम रब्बानी मजिदीत बांगी असून बाबागिरी करायचा व त्याचे किराणा दुकान देखील होते, याच किराणा दुकानात गुलाब रब्बानी शेखचे काही कृत्य शोएब शेखने पाहिले होते. त्यामुळे, तो सर्वांना सांगेल या भीतीने त्याचा काटा काढण्यासाठी गुलाब रब्बानी शेख यांनी शोएबची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीस फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी मृत शोएबचे वडील रशीद शेख व कुटुंबियांनी केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+