Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mumbai Crime News : धक्कादायक! गुन्ह्यात साक्षीदार व्यावसायिकाचा गोळी झाडून खून! मीरा रोडवरील घटना

Mumbai Crime News : मुंबईतील मीरा रोडवर एका 35 वर्षीय व्यावसायिकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. गंभीर बाब म्हणजे हे व्यावसायिक एका गुन्ह्यात साक्षीदार असल्याचे सांगितले जात आहे. अशा प्रकारे साक्षीदाराची हत्या होणे हे धक्कादायक आहे.

घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज तपासणी

या घटनेनंतर पोलिसांनी आपला तपास सुरु केला असून संशयित आरोपी कोण आहेत हे समजू शकलेले नाही. दरम्यान आरोपीची ओळख पटवण्यासाठी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत.

Mumbai Crime News

मुंबईत खळबळ!

गेल्या काही महिन्यात राज्यात फायरींगच्या घटना घडल्या आहेत, खुनाच्याही घटना घडत आहेत. एकीकडे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्रात खळबळ निर्माण झाली तर दुसरीकडे आता व्यावसायिकाच्या हत्येने मुंबईतही खळबळ निर्माण झाली आहे.

शाॅपिंग सेंटरजवळ खून

मुंबईतील मीरा रोडवर असलेल्या शॉपिंग सेंटरजवळ खुनाची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री काही अज्ञात लोकांनी या पस्तीस वर्षीय व्यावसायिकावर धाडधाड् गोळ्या घातल्या आणि त्यांचा खून केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृताचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.

कुणाचा झाला खून?

व्यावसायिक असलेले तबरेज अन्साली असे मृताचे नाव आहे. शॉपिंग सेंटरमध्ये त्यांचे चष्म्याचे दुकान होते. तबरेज अन्सारी हे एका गुन्ह्यातील साक्षीदार होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही येत होत्या. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.

3 जानेवारीच्या रात्री दहा वाजताची घटना

घडलेल्या घडामोडीनुसार, शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी येऊन तबरेज अन्सारी यांच्या डोक्यात गोळी झाडली, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून आरोपीची ओळख पटविण्यासाठी जवळील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासत त आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+