Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

2 लाखात व्यवहार, 3 महिन्यांत तयारी,यूट्यूबची मदत, बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपींचा मोठा खुलासा

मुंबई : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. तीन महिन्यांपूर्वी पुण्यात बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचल्याचे पोलिस तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शूटरनी यूट्यूबवरून शूटआउटची पद्धत शिकली होती. त्यानंतर ही हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणातील चौथा आरोपी हरीश याने हे सर्व खुलासे पोलिस तपासात केले आहेत.

दोन लाख रुपायासाठी आरोपींनी ही हत्येची सुपारी घेतल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या हत्येसाठी चारही शूटर्सना 50-50 हजार रुपये मिळाले होते. शूटर्स सोशल मीडिया मेसेजिंग ॲप्सद्वारे एकमेकांशी बोलत होते.

baba siddique

आरोपी हरीशने सांगितले की, बाबा सिद्दीकीला त्याच्या घराबाहेर गोळी मारायची होती, त्यामुळे त्यांच्या घराची अनेकवेळा रेकी करण्यात आली, पण ते शक्य झाले नाही. गेल्या 28 दिवसांत या लोकांनी 5 वेळा रेकी केली होती. बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन महिन्यांपासून नजर होती. आरोपीने सांगितले की, अनेक वेळा तर विना शस्त्राशिवाय शुटर बाबा सिध्दीकीच्या घरापर्यंत गेले होते, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र या हत्येचा प्रमुख कोण आहे, याचा तपास सुरू आहे. शूटरने दिलेल्या पोलिस जबाबात हे स्पष्ट झाले आहे की, आदेश मिळल्यानंतर 3 महिन्यांत पुण्यात हत्येचा कट रचला गेला होता. त्यानंतर यावर काम सुरू झाले. शूटर महिनाभरापूर्वी मुंबईतील कुर्ला येथील त्याच्या घरी शिफ्ट झाला, परंतु गोळीबाराच्या या कटाचा आदेश पंजाब कारागृहातून आला होता की साबर माती तुरुंगातून हे अजून स्पष्ट झालं नाही.

मिळालेल्या माहीतीनुसार अटक करण्यात आलेल्या चौथ्या आरोपी हरीशने पैशांपासून ते दुचाकीपर्यंतची सर्व व्यवस्था केली होती. तो शुटरसाठी मधला माणूस म्हणून काम करत होता. शुटर शिवकुमार, गुरनेल आणि धरमराज यांना एकूण दोन लाख रुपये देण्यात आले होते. त्यांच्या राहाण्यासाठी आणि खर्चासाठी ही रक्कम अटक करण्यात आलेल्या प्रवीण लोणकरचा भाऊ शुभम लोणकर याने दिली होती.

हरीशला घटनेची संपूर्ण माहिती होती. पुण्यातील बाबा सिद्दीकी यांचा फोटो त्यांनीच दिला होता. तोपर्यंत शुटरला बाबा सिद्दीकी कोण आहेत याची माहीती नव्हती. हरीश हा 9 वर्षांपासून पुण्यात राहत होता. त्याला मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक गोष्टीची माहिती आहे, तरीही तो या कटाचा भाग झाला. गोळीबार करणाऱ्यांना रोख रक्कम तसेच मोबाईल देण्यात आले होते, अशी माहिती देण्यात आली आहे.

यूट्यूबवरून शूट करायला शिकलो

युट्यूबवरील गुन्हेगारी जगताच्या घटना आणि मालिका पाहून शूट करायचे शिकल्याचे शूटर्सने पोलिस तपासात सांगितले. 4 आरोपींना अटक केल्यानंतर 3 आरोपी अजूनही फरार आहेत. यामध्ये शुभम लोणकरला अटक झाल्यास आणखी अनेक नावे समोर येण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+