मोठी बातमी! मुंबई मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेकची मुख्य कार्यकारी समिती जाहीर, कुणाची लागली वर्णी? वाचा
Mumbai bmc election 2025 : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा येत्या काळात कोणत्याही क्षणी होऊ शकते, एकीकडे निवडणूक आयोग कामाला लागला असतानाच राजकीय पक्षही आपापल्या परीने निवडणुकीची तयारी करत आहे.
शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
मुंबईतही निवडणुकीची रणधुमाळी येत्या काळात दिसून येणार असून राजकीय पक्षांच्या युत्या, आघाड्या, पक्षप्रवेश होत आहेत. उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता असून दुसरीकडे शिवसेनेनेही मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे. निवडणुका जवळ आल्या असताना, शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) पक्षाची मुख्य कार्यकारी समिती जाहीर केली आहे. या समितीमध्ये पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण २१ महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

समितीच्या माध्यमातून पक्षाची रणनिती निश्चित होणार
शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाच्या धोरणात्मक आणि महत्त्वपूर्ण निर्णयांवर लक्ष ठेवणार आहे. यात शिवसेना नेते, खासदार, माजी खासदार, आमदार आणि माजी आमदारांना स्थान देण्यात आले आहे, जेणेकरून पक्षाची निवडणूक तयारी अधिक मजबूत होईल. या समितीच्या माध्यमातून मुंबईतील स्थानिक राजकारण आणि पक्षाची रणनीती निश्चित केली जाईल.
शिवसेनेची मुख्य कार्यकारी समितीत कोण-कोण?
१) एकनाथ शिंदे, मुख्य नेते
२) रामदास कदम, नेते
३) गजानन कीर्तीकर, नेते
४) आनंदराव अडसूळ, नेते
५) मीनाताई कांबळी, नेत्या
६) डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार
७) रवींद्र वायकर, खासदार
८) मिलिंद देवरा, राज्यसभा - खासदार
९) राहुल शेवाळे, माजी खासदार
१०) संजय निरुपम, माजी खासदार
११) प्रकाश सुर्वे, आमदार
१२) अशोक पाटील, आमदार
१३) मुरजी पटेल, आमदार
१४) दिलीप लांडे, आमदार
१५) तुकाराम काते, आमदार
१६) मंगेश कुडाळकर, आमदार
१७) श्रीमती मनिषा कायंदे, विधान परिषद, आमदार
१८) सदा सरवणकर, माजी आमदार
१९) यामिनी जाधव, माजी आमदार
२०) दीपक सावंत, माजी आमदार
२१) शिशिर शिंदे, माजी आमदार
हेही वाचा : कोकणात राज नंतर उद्धव ठाकरेंनाही बसणार मोठा धक्का? 'हा' नेता महायुतीच्या वाटेवर, कोणता झेंडा घेणार?
एकीकडे एकनाथ शिंदे यांचा पक्ष असलेला शिवसेना हा भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यासोबत सत्तेत आहे, तर भाजपविरोधात गेल्या काही काळांपासून लढणारा उल्हासनगर येथील पप्पू कलानी यांचे पूत्र ओमी कलानी यांनी शिवसेनेला पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता उल्हासनगरच्या महानगर पालिका निवडणुकीत रंगत येणार आहे.
हेही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेना ठरणार 'गेमचेंजर', शिंदेंचा 'ग्राऊंड कनेक्ट' ठरेल जमेची बाजू!












Click it and Unblock the Notifications