कोकणात राज नंतर उद्धव ठाकरेंनाही बसणार मोठा धक्का? 'हा' नेता महायुतीच्या वाटेवर, कोणता झेंडा घेणार?

maharashtra konkan politics News : महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच महत्त्वाचा मानला जाणारा कोकण विभाग सध्या मोठ्या राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू बनला आहे.

मनसेला मोठा धक्का बसल्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेलाही कोकणात मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दापोली, खेड आणि मंडणगड या मतदारसंघातील ठाकरे गटाचा एक युवा नेता महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या कोकणात जोरदार सुरू आहे.

'ऑपरेशन टायगर' की 'ऑपरेशन लोटस'?

सध्या रत्नागिरी जिल्ह्यात, विशेषतः दापोली-खेड विधानसभा मतदारसंघात गुप्त राजकीय बैठकांचा सपाटा सुरू आहे. खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेतून निलंबित झालेले वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याच्या चर्चेनंतर आता ठाकरे गटातील एका महत्त्वाच्या युवा नेत्याच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे.

या नेत्याने शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांशी गुप्त बैठका घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तो 'कोणता झेंडा घेऊ हाती?' या विचारात असल्याचे म्हटले जात आहे.

माजी आमदार संजय कदम यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर दापोली नगरपंचायतीमधील काही नगरसेवकांनीही शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला होता. त्यामुळे आगामी काळात अशा आणखी राजकीय भूकंपांची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्ष ममता मोरे यांनी नुकत्याच वाढदिवसाच्या निमित्ताने ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे फोटो सोशल मीडियावर टाकल्याने त्यावरूनही राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Konkan Politics

ठाकरे गटातील नेत्याची अस्वस्थता!

दापोलीतील ठाकरे गटाच्या युवा नेत्याच्या हालचालींमुळे सध्या पक्षात अस्वस्थता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा युवा नेता सध्या आपल्या पक्षात अस्वस्थ असून त्याने शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नेत्यांबरोबर काही गुप्त बैठका घेतल्या आहेत.

याव्यतिरिक्त, त्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांशीही संपर्क साधला असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, भविष्यातील आपली राजकीय वाटचाल शिवसेना (शिंदे गट) की भाजप असणार, याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

दिवाळीपूर्वी राजकीय फटाके?

कोकणातील या घडामोडी पाहता, आगामी दिवाळीपूर्वीच मोठे राजकीय फटाके फुटणार असल्याची शक्यता आहे. एकीकडे वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आणि दुसरीकडे ठाकरे गटातील या युवा नेत्याच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा यामुळे कोकणातील राजकारण तापले आहे.

या नेत्याचा निर्णय काय असणार, यावर कोकणातील आगामी राजकारणाची दिशा अवलंबून असेल. विशेषतः ठाकरे गट आणि महायुती यांच्यातील संघर्षाला या घटनेमुळे आणखी धार येईल असे दिसते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+