Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'संडास साफ करणारा पोरगा कधीपासून बंदुक चालवायला लागला?' अक्षय शिंदे एन्काउंटरवरुन संजय राऊतांचा सवाल

Badlapur Case Akshay Shinde Encounter : बदलापूरमधील एका खाजगी शाळेत दोन चिमुरड्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी अक्षय शिंदे हा पोलीस चकमकीत ठार झाला, यानंतर अनेक लोकांनी एन्काउंटरचे समर्थन केले तर विरोधकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी देखील या एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित करत संडास साफ करणारा पोरगा कधीपासून बंदुक चालवायला लागला?" असा सवाल केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, पोलिसांच्या कमरेवरची बंदुक हिसकावणाली ती लॉक झालेली बंदुक फायर केली हे कोणाला पटेल का? असा सवाल संजय राऊत यांनी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात उपस्थित केला आहे. अक्षय शिंदे काल पोलीस एन्काऊटरमध्ये मारला गेला. "पोलीस, सरकार, फडणवीस, एकनाथ शिंदे हे आपटे, कोतवाल, आठवले यांना वाचवत आहेत. त्यासाठी मुख्य पुरावा नष्ट केला असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

Sanjay Raut

..ते गुन्हे मागे घ्या

राऊत पुढे म्हणाले की, या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात हजारो बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरुन त्यादिवशी सरकारकडे आरोपीला आताच्या आता फाशी देण्याची मागणी केली लोकभावनेचा उद्रेक झाला त्यांनी मंत्र्यांना पिटाळून लावलं. अधिकाऱ्यांना येऊ दिलं नाही. पण "दुसऱ्यादिवशी देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही.

एकनाथ शिंदे म्हणालेंनी फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आश्वासन दिले. मग दुसऱ्यादिवशी हजारो आंदोलकांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला? हा माझा प्रश्न सरकारला सवाल आहे, त्यांची मागणी न्याय होती, हे या एन्काऊंटरमधून सिद्ध केलं. तुम्ही कोर्टात खटला चालवला नाही. मग तुम्ही शेकडो आंदोलकांनवर गुन्हे दाखल करुन धिंड काढली ते गुन्हे मागे घ्या.

'त्यांना' वाचविण्यासाठी हे सगळे केले

या एन्काउंटरमागे कोणाला तरी वाचवायचं आहे, ज्यांना वाचवायचे आहे त्यांच्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचा वरदहस्त आहे. शाळेतील साीसीटीव्ही फुटेज हे ज्याचा एन्काउंटर झाला त्याने काढलेले नाही तर शाळेच्या संस्था चालकाने ते फुटेज काढून टाकले. ही संस्था भाजपाशी संबंधित आहे. आणि संस्थाचालक शिंदे, फडणवीसांशी संबंधित आहेत. म्हणून त्यांना वाचवण्यासाठी हा सगळा खेळ रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+