Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ठाकरे गटाला धक्का, सात आमदारांचा शपथविधी, संजय राऊत म्हणाले...

मुंबई : बहुप्रतिक्षित राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या यादीतील 7 आमदारांची नावे अखेर जाहीर झाली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या सात नावांची शिफारस राज्यपालांनी मान्य केली आहे. नुकताच सेंट्रल हॉल येथे या सात आमदारांचा शपथविधी झाला. उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत या सात जणांना आमदारकी देण्यात आली. आज महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला.

ठाकरे गटाला बसला मोठा धक्का

या शपथविधीवर आक्षेप घेत ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तातडीने शपथविधी रोखण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती. याचिकाकर्ते सुनील मोदी यांच्या वकिलांनी सात आमदारांची आज नियुक्ती होत असल्याची माहिती न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांना दिली. यावर सरकारी वकिलांनी राज्यपालांच्या निर्णयावर आपण कोणतीही भूमिका घेऊ शकत नसल्याचे सांगितले. यावेळी न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांनी मी आज तातडीने निर्णय देऊ शकत नाही. मात्र येणाऱ्या निर्णयात दिलेल्या माहितीचा मी विचार करेन, असे सांगितले. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी आजच होणार, हे निश्चित झाले. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Sanjay Raut

कुणाला मिळाली आमदारकीची संधी?

हेमंत पाटील, शिवसेना (एकनाथ शिंदे)
मनिषा कायंदे, शिवसेना (एकनाथ शिंदे)
पंकज भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
इद्रिस इलियास नाईकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
महंत बाबूसिंग महाराज, बंजारा समाजाचे धर्मगुरु (भाजपा)
विक्रांत पाटील (भाजपा)
चित्रा वाघ (भाजपा)

संजय राऊत यांनी केला मोठा आरोप

हे सरकार घटनाबाह्य आहे. यावरील याचिका आणि निकाल प्रलंबित आहे. अद्याप निकाल आला नाही. तरीही निवडणुकीच्या आधी विविध जाती धर्माच्या सदस्यांना शपथ देताय. हे घटनाबाह्य आहे. केंद्र सरकारच्या मदतीनं राज्यपालांच्या द्वारे हे काम केलं आहे. आम्ही पाठवलेल्या यादीला एक न्याय आणि एकाला दुसरा न्याय दिला आहे. सात विधान परिषद आमदार नियुक्ती विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. पहिली यादी प्रलंबित असताना दुसरी यादी कशी काय मान्य करताय, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+