मनसे 'ॲक्शन'मोडवर! मराठीबद्दल उलटसुलटं बोलतो म्हणून मनसैनिकांचा पुण्यात परप्रांतीयाला चोप!
पुणे - विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही हळूहळू अॅक्टीव्ह होत असताना पाहायला मिळत आहे. पुण्यात मनसेने एका दुकानदाराला मराठीबद्दल उलट-सुलटं बोलतो म्हणून चोप दिला. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर आता चांगलाच व्हायरल होत आहे.
मराठीचा अपमान केल्याचा दावा
मराठी भाषेचा अपमान करीत असल्याचा दावा मनसे पदाधिकाऱ्याचा आहे. दरम्यान मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एका मेडीकल दुकानदाराला चोप दिला. हा दुकानदार परप्रांतीय असल्याचे सांगण्यात येत आहे.

धानोरी उपनगरातील ही घटना आहे. मराठी ग्राहकाशी वाद झाल्यानंतर त्याच्यासोबत शिविगाळ त्याने केली. त्यानंतर या दुकानदाराने मराठी भाषा मला कळत नाही असे म्हणत मराठी बोलण्यास नकार दिला. यासंदर्भातील व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
काय आहे व्हिडिओत?
मनसेचे पदाधिकारी दुकानदाराला मारतानाचा व्हिडिओ पुढे आला असून त्याला चांगलाच दम भरतानाचे शब्हही या व्हिडिओत ऐकू येतात. काहीजण लाल शर्टमधील दुकानदाराच्या कानशिलात लगावतात तर काही त्याला ओढत बाहेर आणतात. या मनसैनिकांच्या गळ्यात पक्षाचा रुमालही दिसून आला.
दुकानदारावर शाईफेक
काही पदाधिकाऱ्यांनी चहुबाजूने धरुन अरेरावी केली तर एकाने एका डब्यातील शाई या दुकानदाराच्या तोंडावर फेकली. मराठी भाषेबद्दल उलटे-सुलटे बोलतो असे म्हणत त्याला नंतर मारहाणही करण्यात आली. यावेळी दुकानदार माझे ऐका मी काय बोललो होतो हेही ऐका असे सांगत असतानाच माफी माग असे पदाधिकारी त्याला म्हणाले. त्यानंतर हात जोडून या दुकानदाराने माफीही मागितली.
मनसे स्टाईल पुण्यातील धानोरी मधील परप्रांतीय मेडिकल मालकाने मराठी भाषेचा अपमान करत मराठी बोलण्यास नकार दिला तसेच मराठी मुलाचा अपमान केला होता आज आमचे मनसैनिक श्री गणेश पाटिल व कृष्णा मोहिते, श्री मनोज ठोकळ, श्री येवले, श्री अचितुराव मोरवडे, आदी महाराष्ट्र सैनिकनी चोप दिला.#मनसे pic.twitter.com/TXM6Tx65sD
— Abhishek Mhamunkar (मी पण महाराष्ट्र सैनिक) (@AbhiMhamunkar) July 18, 2024
मनसे स्टाईल मारहाण
गेल्या दोन दिवसांपुर्वी एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात मराठी येत नाही, मला मराठी चालणार नाही असे या मेडिकल दुकानदाराने म्हटल्याचा दावा मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा आहे. त्यानंतर आज या मनसैनिकांनी मनसे स्टाईलने या दुकानदाराला मारहाण केली आहे.
..ही केली एक्सवर पोस्ट
"मनसे स्टाईल पुण्यातील धानोरी मधील परप्रांतीय मेडिकल मालकाने मराठी भाषेचा अपमान करत मराठी बोलण्यास नकार दिला तसेच मराठी मुलाचा अपमान केला होता आज आमचे मनसैनिकांनी चोप दिला." असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मनसे पुन्हा गाजवणार मराठीचा मुद्दा
नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर आता लोकसभा निवडणुका लागत आहेत. या धर्तीवर मनसेही अॅक्शन मोडवर असून येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेला चांगल्या यशाची अपेक्षा आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले असून येत्या काळात मनसे अधिक आक्रमकपणे मराठीचा मुद्दा पुढे करणार असल्याचे हे सुचक संकेत आहे.












Click it and Unblock the Notifications