MNS 4th candidates list : मनसेची 5 उमेदवारांची चौथी यादी जाहीर, वाचा- कोणत्या मतदारसंघात कोण शिलेदार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चौथी यादी शुक्रवार सायंकाळी जाहीर करण्यात आली. चौथ्या यादीत 5 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे.
या उमेदवारांचा समावेश
- कसबा पेठ मतदारसंघातून गणेश भोकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- चिखली मतदारसंघातून गणेश बरबडे हे लढणार आहेत.
- कोल्हापूर उत्तर मधून अभिजित राऊत यांना संधी दिली आहे.
- केजमधून रमेश गालफाडे यांना उमेदवारी दिली आहे.
- कलीना येथून संदीप उर्फ बाळकृष्ण हुटगी हे लढणार आहेत.

दुसऱ्या यादीत अमित ठाकरेंचे होते नाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. विशेष म्हणजे या यादीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
सोमवारी मनसेकडून राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून तर अविनाश जाधव ठाण्यातून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. वरळीत ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात लढत रंगणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याआधी बाळा नांदगावकर (शिवडी, मुंबई), दिलीप धोत्रे (पंढरपूर), संतोष नागरगोजे (लातूर ग्रामीण), बंडू कुटे (हिंगोली विधानसभा), मनदीप रोडे (चंद्रपूर), सचिन भोयर (राजुरा), राजू उंबरकर (यवतमाळ) हे उमेदवार घोषित केले होते.
राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतील बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. काही उमदेवारांसाठी त्यांनी सभा देखील घेतल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर राज ठाकरे यांनी आता विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. राज ठाकरे महायुती, महाविकास आघाडी तसेच इतर कोणत्याही पक्षाला देणार नसल्याचे राज ठाकरे यांनी मागेच जाहीर केले.












Click it and Unblock the Notifications