बापरे..! सुरेश धसांनी उघड केले टाँप सिक्रेट; करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तूल कुणी ठेवलं, खंडणी किती..
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याकांडातील नवी माहिती आज प्रसारमाध्यमांसमोर मांडली. संतोष देशमुखांची हत्या ज्या खंडणी प्रकरणातून झाली ती खंडणी नेमकी किती होती, किती पैसे दिले होते, फोन कुणी केले होते, ही सगळी माहिती त्यांनी आज पोलिस अधिक्षकांना दिली. याशिवाय सप्टेंबर २०२१ साली करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल कुणी ठेवलं होतं, हेही त्यांनी आज एसपींना सांगितलं. सुरेश धस यांच्या या टाँप सिक्रेटमुळे आज पुन्हा एकदा खळबळ उडाली.

काय म्हणाले सुरेश धस?
पत्रकार परिषदेत सुरेश धस म्हणाले, "या प्रकरणात एका कंपनीकडे खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यापैकी 50 लाख रुपये दिले आहेत. उरलेले दीड कोटी रुपयांसाठी आकांनी डायरेक्ट माणसेच पाठवली. आकांनी सांगिल्यावर हे लोक शुक्रवारी तेथे गेले. आता या सगळ्या प्रकरणात सीडीआर काढल्यानंतर, कोण कुणाला काय बोललं हे सर्व बाहेर येणार आहे. त्यामुळे आका यातून बाहेर येईल, असं वाटत नाही."
इतर आरोपीही बाहेर येतील
पोलिसांचा सगळा फोकस आका पकडण्याकडे होता. इतर आरोपी त्यामुळे राहीलेत. इतर लोक देखील लवकरात लवकर पकडले जातील. यात कुणालाही सोडणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. काय माहिती द्यायचीय ती मी एसपींना दिली आहे. त्यातील टॉप सिक्रेट्स बाहेर सांगू नका, असं एसपींनी सांगितलं आहे. त्यामुळे मी ते प्रसारमाध्यमांना सांगणार नाही.
पालकमंत्री कोण व्हावा?
प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सुरेश धस यांनी बीडच्या पालकमंत्र्याबाबतही मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले, बीडच्या पालकमंत्रीपदासाठी आमची पहिली पसंती ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. ते नाही तर किमान उपमुख्यमंत्री अजित पवार आमचे पालकमंत्री व्हावेत. आमचा जिल्हा अजित पवारही सुतासारखा सरळ करतील. अजित दादांसोबत मी काम केलं आहे. त्यांना वेड्या वाकड्या गोष्टी जमत नाहीत," असंही सुरेश धस यांनी स्पष्ट सांगितलं.
गाडीत पिस्तूल कुणी ठेवले?
धस यांनी आणखीही गंभीर आरोप यापूर्वी केले होते. ते म्हणाले, २०२१ साली करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल सापडले होते. ते पिस्तूल ठेवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून बीड जिल्ह्यातील पोलिस दलातील व्यक्ती होती. तिचे नावही मला माहित आहे. मात्र मी ते बाहेर सांगणार नाही. एसपींना सांगेल. बीड पोलिस दलातील अनेक लोकांची बदली आकाच करतो. याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती दिली आहे, असं सुरेश धस यांनी सांगितलं.












Click it and Unblock the Notifications