आ. सुनील शिंदे यांच्या गाडीला बेस्ट बसची धडक; अपघात एवढा भिषण होता की...
बेस्ट बसचा अपघात होण्याचे प्रकार मुंबईत वारंवार सुरुच आहेत. आज मुंबईतील दादार परिसरात शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांच्या गाडीला बेस्ट बसने धडक दिली. हा अपघात एवढा भयानक होता की, आ. शिंदे यांची फाँर्च्यूनर गाडीचा पुढचा भाग तुटला. या अपघातात आ. सुनील शिंदे हे थोडक्यात बचावले.

नेमके काय झाले?
मुंबई येथील दादर परिसरामध्ये प्रवास करत असताना सुनील शिंदे यांच्या फॉर्च्युनर कारला बेस्ट बसने धडक दिली. या धडकेमध्ये कारचे समोरून भागामध्ये नुकसान झाले. आ. सुनील शिंदे या अपघातातून थोडक्यात बचावले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये बेस्ट बसेसच्या अपघातांची मालिकाच सुरू आहे.
यापूर्वीही झाले आहेत अपघात
गेल्यावर्षी कुर्ला येथेही बेस्ट बसचा भिषण अपघात झाला होता. त्यावेळी ४९ जणांना बसने चिरडले होते. शेकडो गाड्यांचे नुकसान केले होते. या प्रकरणात चालक व वाहकाला अटक करण्यात आली होती. मात्र मुंबईत बेस्ट बसचे अपघात वाढले असताना आता या बसचा फटका थेट आमदारांना बसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चालकांबाबत तक्रारी
बेस्टच्या बस चालकांबाबत आत्तापर्यंत अनेकदा तक्रारी केल्या गेल्या आहेत. या चालकांना बस चालविण्याचे योग्य प्रशिक्षण दिले जात नसल्याचे सांगितले जाते. शिवाय आता बेस्टच्या ताफ्यात वेगवेगळ्या बस आल्या आहेत. त्यामुळे या बसचे योग्य प्रशिक्षणही चालकांना दिले जात नसल्याची ओरड आहे. चालकांना योग्य प्रशिक्षित केल्याशिवाय त्यांच्या हातात बस दिली जाऊ नये, अशी मागणी आता होत आहे.












Click it and Unblock the Notifications