आरोपी पुण्यातील हाँस्पिटलमध्ये अँडमीट होऊन तमाशा पाहत होते; संदीप क्षीरसागर यांचा मोठा गौप्यस्फोट

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे याला आज पुण्यात अटक झाली. या प्रकरणातील तिसरा आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. आज परभणीत आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात बीडचे आ. संदीप क्षीरसागर यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

Sandeep Kshirsagar

काय आहे क्षीरसागर यांचा दावा

परभणीच्या मोर्चात आ. संदीप क्षीरसागर यांनी भाषण केले. ते म्हणाले, मी संतोष आण्णाच्या मृतदेहाचा फोटो पाहिल्यावर माझं डोकंच सटकलं. त्यांच्या कुटुंबाला भेटल्यावर मी पुढची भूमिका घेतली. या प्रकरणात मुख्य आरोपी हा वाल्मिक कराडच आहे. ६, ९ आणि ११ तारखेचे या आरोपींच्या फोन काँल्सचे सीडीआर काढले तर, सगळे आका आणि आकांचे आका समोर येतील. या प्रकरणात वाल्मिक कराडसह अजूनही धक्कादायक नावे समोर येतील.

काय केला गौप्यस्फोट

आज सुदर्शन घुले व सुधीर सांगळे याला अटक झाली. याबाबत बोलताना आ. क्षीरसागर म्हणाले, ३१ तारखेला वाल्मिक कराड शरण येतो. आता पुण्यातच हे दोन आरोपी सापडतात. हे सगळं फिल्मी स्टाईलने चाललंय. परळी पॅटर्न खूप वेगळा आहे. तोच आपल्याला बदलायचा आहे. आज अटक झालेले दोन आरोपी पुण्यातील एका हाँस्पीटलमध्ये अँडमीट झाले होते. बेडवर झोपून ते सगळा तमाशा पाहत होते. वेळ आल्यावर त्या हाँस्पीटलचं नावही मी सांगणार आहे.

त्या हाँस्पीटलचे सीसीटीव्ही तपासा

आ. क्षीरसागर म्हणाले, मी आठ दिवसांत त्या हाँस्पीटलचं नाव सांगेल जेथे हे दोघे अँडमीट झाल्याचे नाटक झाले. पोलिसांनी त्या हाँस्पीटलचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे. आम्ही रस्त्यावर उतरलो तेव्हा हे दोघे आरोपी बेडवर झोपून सगळा तमाशा पाहत होते. पण आता आम्ही हा परळी पॅटर्न बदलवणार आहोत. पोलिसांनी उरलेल्या आरोपींच्याही लवकरात लवकर मुसक्या आवळाव्यात, असेही आ. क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+