Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भाजप आ. प्रशांत बंब यांच्या सभेत मारहाण, युवकांनी प्रश्न विचारताच आमदाराचा पारा चढला, VIDEO व्हायरल

MLA Prashant Bamb threatened two youths : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघातील एका सभेदरम्यानचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. भाजप आमदार प्रशांत बंब यांना प्रश्न विचारणाऱ्या युवकाला मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तर व्हिडिओमध्ये आमदार प्रशांत बंब हे सदर युवकाला सभास्थळावरुन हाकलून लावण्याची भाषा करत आहेत. या व्हिडिओमुळे आता गंगापूर तालुक्यात गोंधळ उडालेला आहे.

गंगापूर विधानसभा मतदारसंघातील गवळी शिवरा गावात 2 तरुणांनी आमदार प्रशांत बंब यांना रेल्वे संदर्भात आश्वासन दिले होते अजून आले नाही, असा सवाल केला. त्यावर प्रशांत बंब यांनी त्या तरुणांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी न ऐकल्याने सभेला उपस्थिती नागरिक आणि तरुणांमध्ये मोठा वाद झाला. तर काही लोकांनी सदर युवकांना मारहाण केल्याचे देखील समोर आले. तर सभेत गोंधळ घालून वातावरण दूषित करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला.

Maharashtra Assembly Election 2024

विरोधी पक्ष नेत्यांनी केला व्हिडिओ ट्विट

प्रशांत बंब यांच्या सभेतील राड्यावर शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सदर प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून भाजप पक्षश्रेष्ठींना आव्हान केले. दानवे म्हणाले की, देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि भाजप नेते विरोधी पक्षाच्या लोकांना खुल्या चर्चेचे आमंत्रण देत फिरतात. मग एक सामान्य माणूस चर्चेला आला की त्याला असं धमकावण्याचं आणि माणसं अंगावर सोडायची, हे भाजपच्या आमदाराला शोभते का? काय प्रशांत बंब, लोकांना उत्तर देता येत नाही की ही अशी दमदाटी पक्षाच्या शिबिरात शिकवली जाते का?, असा खोचक सवाल आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.

प्रशांत बंब यांची धमकी

महायुतीचे गंगापूर- खूलताबाद मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत बंब यांनी मतदारांना धमकी दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात प्रशांत बंब माझ्या मित्राला आदेश दिला तर पळता भुई थोडी होईल, खाली बैस जास्त आवाज करू नको असे म्हणताना दिसत आहे.

गंगापूर विधानसभेत नेमकी लढत कशी?

गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने भाजपचे प्रशांत बंब व चव्हाण यांच्यात अटीतटीची लढत होणार, असे चित्र आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये पदवीधर मतदारसंघाचे आमदार असलेल्या सतीश चव्हाण यांनी मागील दोन वर्षांपासून गंगापूर-खुलताबाद मतदारसंघामध्ये विधानसभा लढवण्याचे संकेत दिले होते.

परंतु महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटल्याने व काही दिवसांपूर्वी भाजपचे तिकीट विद्यमान आ. बंब यांना निश्चित असल्याने आ. चव्हाण यांनी सरकारविरोधात पत्र लिहून सरकारच्या कारभाराबाबत जाहीर नाराजी व्यक्त केल्याने त्यांना पक्षविरोधी कारवायांच्या कारणावरून निलंबित केले होते. तेव्हा त्यांनी शरद पवार गटात जाऊन उमेदवारी घेतली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+