Sahar Shaikh : कार वॉशिंग सेंटर, 29 वय; जाणून घ्या सहार शेखबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी
Sahar Shaikh Age & Education : ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026 च्या निकालांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 30 मधून AIMIM (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) च्या उमेदवार सहार शेख यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या प्रभागात सहार शेख यांनी मिळवलेल्या विजयामुळे मुंब्र्यातील राजकारणाची समीकरणे बदलली आहेत.

उमेदवारी अर्जातील महत्त्वाची माहिती
निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अधिकृत नामनिर्देशन पत्रानुसार (Affidavit), सहार शेख यांची पार्श्वभूमी खालीलप्रमाणे आहे.
- वय: सहार शेख यांचे वय 29 वर्षे आहे. तरुण चेहरा असल्याने तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेझ दिसून आली.
- शिक्षण: त्यांनी Bachelor in Business Management Studies (BMS) ही पदवी Mumbai विद्यापीठातून पूर्ण केली आहे. त्यांच्या उच्चशिक्षित असण्याचा फायदा त्यांना प्रचारात झाला.
- व्यवसाय: नामनिर्देशन पत्रात त्यांनी आपला मुख्य व्यवसाय म्हणून Car Washing Center (कार वॉशिंग सेंटर) नमूद केला आहे.
विजयानंतरच्या वक्तव्याने वेधले लक्ष
विजयाचा गुलाल उधळल्यानंतर सहार शेख यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी केलेल्या "संपूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकू" या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवली आहे. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी टीका केली असली, तरी सहार यांनी "हा माझ्या पक्षाचा रंग आहे" असे म्हणत आपले स्पष्टीकरण दिले आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
सहार शेख यांचे वडील युनूस शेख यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन एमआयएममध्ये प्रवेश केल्यामुळे ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. केवळ 29 वर्षांच्या असलेल्या सहार यांनी प्रस्थापित नेत्यांना टफ फाईट देत विजय मिळवल्यामुळे आता मुंब्र्यात एमआयएमची ताकद वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या विजयानंतर सहार शेख यांनी मुंब्र्यातील नागरी प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.












Click it and Unblock the Notifications