मंत्री एकनाथ शिंदे यांचे पहिल्याच बैठकीत गिफ्ट; 'त्यांना' मिळणार एक लाख घरे
उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण विभागाचा पदभार स्विकारल्यावर एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच बैठकीत आपल्या कामाचा धडाका सुरु केला. पहिल्याच बैठकीत त्यांनी गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पर्यावरण पुरक गृहनिर्माणाला चालना, ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण, परवडणारे रेंटल हाऊसिंग आणि महत्त्वाचे म्हणजे गिरणी कामगारांना एक लाख घरं देण्याचं नियोजन आजच्या बैठकीत करण्यात आले.

काय घेतलेत निर्णय?
गृहनिर्माण विभागाकडून आज गृहनिर्माण धोरणासंर्भातील सादरीकरण एकनाथ शिंदे यांच्यासमोर करण्यात आले. परवडणाऱ्या पर्यावरणपूरक गृहनिर्माण धोरणाला चालना देणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरणात समाविष्ट करणे, परवडणारी रेंटल हाऊसिंग स्क्रिम सुरु करणे आणि गिरणी कामगारांसाठी १ लाख घरं बांधणीचं टार्गेट ठरविणे आदी मुद्द्यांवर चर्चा करुन ती मान्य करण्यात आली. या सगळ्या मुद्यांवर पुढील महिन्यात सविस्तर धोरण तयार होणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.
ज्येष्ठांना मिळणार १ लाख घरे
गिरणी कामगारांसाठी एक लाख घरं बांधण्याचे उद्दीष्ट या बैठकीत ठरविण्यात आले. त्यासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या. लवकरच त्याबाबतचा निर्णय होईल. जे गिरणी कामगार महाराष्ट्रातल्या मुळ गावी स्थलांतरित झाले आहेत त्यांना तिथेच घरं देता येतील का, याची चाचपणी करण्याचे निर्देश गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. २००७ नंतर गृहनिर्माण धोरणच तयार झालं नव्हतं, ते आता करण्यात येत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि गिरणी कामगारांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications