Mhada News : पुणेकरांसाठी खुशखबर! म्हाडाच्या 4,186 घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ!
Pune Mhada News : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीसह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनांमधील एकूण ४,१८६ सदनिकांच्या संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे.
तांत्रिक अडचणी आणि नागरिकांच्या मागणीमुळे आता अर्ज करण्याची शेवटची संधी म्हणून ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सोडतीचे सुधारित वेळापत्रक
- टप्पा : अंतिम मुदत ऑनलाइन
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : ३० नोव्हेंबर २०२५ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)
- ऑनलाइन अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख : ३० नोव्हेंबर २०२५ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)
- RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख : ०१ डिसेंबर २०२५
- (बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत) सदनिका विक्रीसाठी संगणकीय सोडत (पूर्वीची तारीख) ११ डिसेंबर २०२५ (दुपारी १२.०० वाजता)
अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
पुणे मंडळाच्या या सोडतीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह इतर जिल्ह्यांतील एकूण ४,१८६ सदनिकांसाठी आतापर्यंत १,८२,७८१ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १,३३,८८५ अर्ज अनामत रकमेसह जमा झाले आहेत.
मुदतवाढीचे कारण काय?
पुणे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक अर्जदारांना अर्ज करताना आणि कागदपत्रे पडताळणीसाठी तांत्रिक अडचणी आल्या होत्या. तसेच, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नागरिकांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. नागरिकांची ही मागणी आणि सोडतीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
सदनिकांचा तपशील: ४ घटकांत विभागणी
म्हाडा पुणे मंडळाने जाहीर केलेली ही सोडत एकूण चार प्रमुख घटकांमध्ये विभागली गेली आहे, ज्यामध्ये विविध उत्पन्न गटांसाठी घरे उपलब्ध आहेत:
- म्हाडा गृहनिर्माण योजना (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य) : १६८३ सदनिका.
- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य): २९९ सदनिका.
- १५% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (PMRDA हद्दीत): ८६४ सदनिका.
- २०% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (पुणे मनपा, चिंचवड मनपा, PMRDA हद्दीत) : एकूण ३२२२ सदनिका.
-
Horoscope Today March 13 2026 : 'या' राशींच्या आयुष्यात आर्थिक लाभ अन् खास बदल, वाचा आजचे राशीभविष्य -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
पालकांकडून मिळालेल्या धड्यांनी माझ्या नेतृत्वाचा दृष्टिकोन घडवला: करण अदानी -
इराण-इस्त्रायल युद्धात उत्तर कोरियाची उडी: इराणवरील हल्ल्याचा निषेध,किम जोंग-उनांनी डागले मिसाईल! -
होर्मुझची कोंडी, युएईचा 'मास्टरस्ट्रोक'; इराण-इस्रायल युद्धाच्या सावटात भारतासाठी नवे ऊर्जा द्वार! -
महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय! अदानी फाऊंडेशन भारतातील 10 लाख महिलांना देणार उद्योजकतेचे बळ -
'धुरंधर-2' साठी प्रेक्षकांची तुफान गर्दी; रणवीर सिंहच्या स्पाय-ॲक्शन थ्रिलरचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू! -
Maharashtra weather update: एकीकडे महाराष्ट्र तापला! दुसरीकडे 'या' ठिकाणी पावसाचा इशारा -
शिवम दुबे-अंजुम खानची 'हटके' लव्हस्टोरी; धर्माची भिंत ओलांडली! शिवमपेक्षा पत्नी वयाने 'एवढी' मोठी -
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'ने मोडला पवन कल्याणचा रेकॉर्ड; पहिल्या दिवशी बाॅलीवूडला हादरवणारी 'एवढी' कमाई








Click it and Unblock the Notifications