MHADA Lottery 2025 : म्हाडाच्या लाॅटरीसाठी काय कागदपत्रे लागतात; ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
MHADA Lottery 2025 What documents are required : म्हाडाचे घर कुणालाही हवेहवेसे वाटणारेच..कारण योजनेतून घर मिळावे म्हणून वर्षानुवर्षे अर्ज भरणारे आपण पाहतो, लाखो अर्ज या योजनेसाठी येतात. म्हाडाच्या घरासाठी एकाच व्यक्तीने 70 पेक्षा अधिक अर्ज भरले होते, हा अनुभवही आहे. म्हणजेच म्हाडाच्या घराला किती महत्व आहे हे यातून स्पष्ट होते. अनेकांना म्हाडाचे घर हवे असते पण त्यासाठी नेमके काय करावे लागते हेच माहित नसते.
म्हाडाच्या घर हे बाजारमुल्यांपेक्षा स्वस्त असते. म्हाडाच्या घरासंदर्भात फसवणूक कधीच होत नाही, सरकारकडून प्रक्रिया केली जात असल्याने आर्थिक व्यवहार ते फ्लॅट मिळेपर्यंत सर्व गोष्टी निसंदेहपणे करता येतात, तिथे सर्व बाबी कायदेशीर मार्गाने होतात त्यामुळे म्हाडाचे घर ही एक मोठी हमी देते. शिवाय म्हाडाचा फ्लॅट इतर खासगी बिल्डरच्या फ्लॅटच्या तुलनेत स्वस्त असतो आणि तो प्रत्येकाला फायदेशीर ठरतो. पंतप्रधान आवास घरकुल योजना ते पंतप्रधान घरकुल योजनेतून विशिष्ट घरांसाठी अडीच लाखांचे अनुदानही मिळते. त्यामुळे म्हाडाच्या घरासाठी सर्वांचा ओढा असतो.

आता हे म्हाडाचे घर मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा, लाॅटरीसाठी काय काय कागदपत्रे लागतात, ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे सर्व खाली देत आहोत, या माहितीच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्वप्नातील घरासाठी अर्ज करु शकता.
म्हाडा लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे
ओळख आणि पत्त्याचा पुरावा:
1. पॅन कार्ड: अर्जदाराचे स्वतःचे पॅन कार्ड (विवाहित असल्यास पती/पत्नीचे पॅन कार्ड).
2. आधार कार्ड: अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड (विवाहित असल्यास पती/पत्नीचे आधार कार्ड). तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे. पासपोर्ट साईज फोटो: अर्जदाराचा अलीकडील रंगीत फोटो.
3. उत्पन्नाचा पुरावा: तुमच्या उत्पन्न गटाच्या (उदा. EWS, LIG, MIG, HIG) नुसार उत्पन्नाचा पुरावा आवश्यक असतो. यामध्ये तुम्ही आयकर परतावा (ITR) प्रमाणपत्र किंवा तहसीलदार/जिल्हाधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र सादर करू शकता. हे प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षाचे असावे.
4. अधिवास प्रमाणपत्र: डोमिसाईल सर्टिफिकेट (अधिवास प्रमाणपत्र): तुम्ही महाराष्ट्राचे कायम रहिवासी आहात हे सिद्ध करण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र गेल्या ५ वर्षांमधील असावे आणि त्यावर बारकोड असणे गरजेचे आहे.
5.मोबाईल क्रमांक आणि इमेल आयडी : लाॅटरीसाठी तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल क्रमांक जो आधारशी लिंक असेल आणि इमेलआयडी आवश्यक आहे.
6. बँक खाते तपशील: तुमचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे. अर्जासोबत तुम्हाला रद्द केलेला चेक (Cancelled Cheque) किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी लागेल.
आरक्षण प्रवर्गासाठी आवश्यक कागदपत्रे:
जर तुम्ही आरक्षित प्रवर्गातून (उदा. SC, ST, OBC, दिव्यांग, माजी सैनिक) अर्ज करत असाल, तर संबंधित सरकारी प्राधिकरणाने दिलेले वैध जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया (स्टेप-बाय-स्टेप)
म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. खालील टप्पे वापरून तुम्ही अर्ज करू शकता.
अधिकृत वेबसाईट निवडा: सर्वप्रथम, म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in ला भेट द्या किंवा "म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टम" ॲप डाउनलोड करा.
नोंदणी (Registration): वेबसाइटवर 'Signup' पर्यायावर क्लिक करा.
तुमचा पॅन कार्ड नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून खाते तयार करा.
तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) टाकून मोबाईल नंबर सत्यापित करा.
त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून आणि ओटीपीद्वारे तो सत्यापित करा.
माहिती भरणे आणि कागदपत्रे अपलोड करणे:नोंदणी झाल्यावर तुमच्या युजर नेम आणि पासवर्डसह लॉग इन करा.
तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, वार्षिक उत्पन्न आणि बँक खाते तपशील भरा.
तुमच्या उत्पन्न गट (EWS, LIG, etc.) आणि आरक्षण श्रेणीनुसार कागदपत्रे अपलोड करा. कागदपत्रे स्पष्ट आणि योग्य फॉरमॅटमध्ये (उदा. PDF, JPEG) असावीत.
योजना निवडणे आणि अर्ज सादर करणे
उपलब्ध लॉटरी योजनांपैकी तुम्हाला अर्ज करायची असलेली योजना निवडा.
तुम्ही कोणत्या अपार्टमेंटसाठी अर्ज करत आहात, तो स्कीम कोड (Scheme Code) निवडा.
सर्व माहिती आणि कागदपत्रे पुन्हा एकदा तपासा आणि अर्ज सबमिट करा.
अर्ज शुल्क भरणे: अर्जासोबत तुम्हाला अनामत रक्कम (Earnest Money Deposit - EMD) भरावी लागते.
ही रक्कम तुम्ही ऑनलाइन पेमेंट पद्धती जसे की UPI, नेट बँकिंग किंवा NEFT/RTGS वापरून भरू शकता.
पावती जतन करणे:अर्ज सबमिट केल्यानंतर आणि पेमेंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक पावती मिळेल. ही पावती आणि अर्जाचा संदर्भ क्रमांक (Reference Number) भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवा.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुम्ही लॉटरीच्या पुढील टप्प्यांसाठी पात्र ठराल. कोणत्याही अडचणीसाठी, तुम्ही म्हाडाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधू शकता.
-
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य -
PF चे पैसे आता 3 दिवसांतच मिळणार! नोकरी बदलली तरी 'ऑटोमॅटिक ट्रान्सफर' होणार; नवे नियम वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
LPG e-KYC Update : सर्व गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी गरजेची आहे का? पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा खुलासा







Click it and Unblock the Notifications