Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

mhada lottery 2025: स्वस्तात घर घेण्याची सुवर्णसंधी; 1323 प्लॅट नोंदणीला मुदतवाढ, कसा करायचा अर्ज!

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MHADA) छत्रपती संभाजीनगर मंडळाने घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. मंडळाने छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनांमधील घरांसाठीच्या लॉटरीच्या अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे.

यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2025 होती, ती आता वाढवून 31 ऑगस्ट 2025 करण्यात आली आहे. त्यामुळे, ज्यांनी अजून अर्ज केला नाही त्यांना अर्ज करण्यासाठी आणखी वेळ मिळाला आहे.

MHADA Lottery 2025

लॉटरीमध्ये काय आहे?

या लॉटरीमध्ये एकूण 1323 निवासी सदनिका आणि 18 भूखंडांचा समावेश आहे. यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील घरांचा समावेश आहे.

घर घेण्याची इच्छा असलेल्या अर्जदारांनी https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा, असे आवाहन मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी केले आहे.

लॉटरीचे सुधारित वेळापत्रक!

  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ ऑगस्ट २०२५, रात्री ११.५९ वाजेपर्यंत.
  • ऑनलाईन पेमेंट करण्याची अंतिम तारीख: ३१ ऑगस्ट २०२५, रात्री ११.५९ वाजेपर्यंत.
  • बँकेत RTGS / NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख: १ सप्टेंबर २०२५, बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत.
  • स्वीकृत अर्जांची प्रारुप यादी प्रसिद्धी: ८ सप्टेंबर २०२५, दुपारी ३ वाजता.
  • स्वीकृत अर्जांची अंतिम यादी प्रसिद्धी: १८ सप्टेंबर २०२५, दुपारी १२ वाजता.
  • लॉटरी काढण्याचा दिनांक आणि वेळ: २६ सप्टेंबर २०२५, सकाळी ११ वाजता.
  • लॉटरीचे ठिकाण: जिल्हा नियोजन समिती सभागृह (DPC Hall), जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर.

म्हाडा लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे

1. पॅन कार्ड: अर्जदाराचे स्वतःचे पॅन कार्ड (विवाहित असल्यास पती/पत्नीचे पॅन कार्ड).

2. आधार कार्ड: अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड (विवाहित असल्यास पती/पत्नीचे आधार कार्ड). तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे. पासपोर्ट साईज फोटो: अर्जदाराचा अलीकडील रंगीत फोटो.

3. उत्पन्नाचा पुरावा: तुमच्या उत्पन्न गटाच्या (उदा. EWS, LIG, MIG, HIG) नुसार उत्पन्नाचा पुरावा आवश्यक असतो. यामध्ये तुम्ही आयकर परतावा (ITR) प्रमाणपत्र किंवा तहसीलदार/जिल्हाधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र सादर करू शकता. हे प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षाचे असावे.

4. अधिवास प्रमाणपत्र: डोमिसाईल सर्टिफिकेट (अधिवास प्रमाणपत्र): तुम्ही महाराष्ट्राचे कायम रहिवासी आहात हे सिद्ध करण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र गेल्या ५ वर्षांमधील असावे आणि त्यावर बारकोड असणे गरजेचे आहे.

5.मोबाईल क्रमांक आणि इमेल आयडी : लाॅटरीसाठी तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल क्रमांक जो आधारशी लिंक असेल आणि इमेलआयडी आवश्यक आहे.

6. बँक खाते तपशील: तुमचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे. अर्जासोबत तुम्हाला रद्द केलेला चेक (Cancelled Cheque) किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी लागेल.

म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. खालील टप्पे वापरून तुम्ही अर्ज करू शकता.

अधिकृत वेबसाईट निवडा: सर्वप्रथम, म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in ला भेट द्या किंवा "म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टम" ॲप डाउनलोड करा.

नोंदणी (Registration): वेबसाइटवर 'Signup' पर्यायावर क्लिक करा.

तुमचा पॅन कार्ड नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून खाते तयार करा.

तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) टाकून मोबाईल नंबर सत्यापित करा.

त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून आणि ओटीपीद्वारे तो सत्यापित करा.

माहिती भरणे आणि कागदपत्रे अपलोड करणे:नोंदणी झाल्यावर तुमच्या युजर नेम आणि पासवर्डसह लॉग इन करा.

तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, वार्षिक उत्पन्न आणि बँक खाते तपशील भरा.

तुमच्या उत्पन्न गट (EWS, LIG, etc.) आणि आरक्षण श्रेणीनुसार कागदपत्रे अपलोड करा. कागदपत्रे स्पष्ट आणि योग्य फॉरमॅटमध्ये (उदा. PDF, JPEG) असावीत.

योजना निवडणे आणि अर्ज सादर करणे
उपलब्ध लॉटरी योजनांपैकी तुम्हाला अर्ज करायची असलेली योजना निवडा.

तुम्ही कोणत्या अपार्टमेंटसाठी अर्ज करत आहात, तो स्कीम कोड (Scheme Code) निवडा.

सर्व माहिती आणि कागदपत्रे पुन्हा एकदा तपासा आणि अर्ज सबमिट करा.

अर्ज शुल्क भरणे: अर्जासोबत तुम्हाला अनामत रक्कम (Earnest Money Deposit - EMD) भरावी लागते.

ही रक्कम तुम्ही ऑनलाइन पेमेंट पद्धती जसे की UPI, नेट बँकिंग किंवा NEFT/RTGS वापरून भरू शकता.

पावती जतन करणे:अर्ज सबमिट केल्यानंतर आणि पेमेंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक पावती मिळेल. ही पावती आणि अर्जाचा संदर्भ क्रमांक (Reference Number) भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवा.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुम्ही लॉटरीच्या पुढील टप्प्यांसाठी पात्र ठराल. कोणत्याही अडचणीसाठी, तुम्ही म्हाडाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधू शकता.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+