Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mhada konkan lottery : म्हाडा कोकण सोडतीचे नवे वेळापत्रक जाहीर! 5,354 घरांसाठी 'या' मुहूर्तावर ड्राॅ

Mhada konkan lottery 2025 revised schedule Out : म्हाडाच्या (MHADA) घरकुल स्वप्नांना पूर्णत्वास नेणाऱ्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ५,३५४ सदनिका आणि ७७ भूखंडांच्या सोडतीसाठी अखेर सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. म्हाडाकडून प्राप्त माहितीनुसार, आता ही संगणकीय सोडत दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे. एकूण पाच हजारांवर घरांसाठी अर्ज दाखल केलेल्यांसाठी ही मोठी संधी आहे.

ठाणे शहर, पालघर जिल्ह्यातील वसई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस, कुळगाव-बदलापूर येथील भूखंडांचा या सोडतीमध्ये समावेश आहे. म्हाडाचे घरं असो की प्लाॅट हे बाजारमुल्यापेक्षा रास्त दरात आहेत आणि ती परवडणारी असतात, म्हणून याकडे ग्राहकांचा ओघ असतो.

Mhada konkan lottery 2025

सोडतीसाठी विक्रमी प्रतिसाद

कोकण मंडळाच्या या महत्त्वाकांक्षी सोडतीसाठी अर्जदारांनी विक्रमी प्रतिसाद दिला आहे. एकूण अर्ज: १,८४,९९४ अर्ज प्राप्त झाले आहेत. अनामत रकमेसह पात्र अर्ज १,५८,४२४ अर्ज दाखल झाले आहेत.

नवीन आणि अंतिम वेळापत्रक : तारीख, वेळ

  • अर्जदारांच्या सोयीसाठी मंडळातर्फे सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये १ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी सहा वाजता स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.
  • ३ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी सहा वाजता पर्यंत प्रारूप यादीवर ऑनलाईन दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी मुदत आहे.
  • ९ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी सहा वाजता सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.
  • ११ ऑक्टोबर २०२५ सोडत होणार सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार.

अशा आहेत सदनिकांची संख्या आणि गट

कोकण मंडळाची ही सोडत एकूण पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे.

  • २०% सर्वसमावेशक योजना: ५६५ सदनिका
  • १५% एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना: ३,००२ सदनिका
  • म्हाडा कोकण मंडळ योजना (विखुरलेल्या सदनिका - आहे त्या स्थितीमध्ये): १,७४६ सदनिका
  • म्हाडा कोकण मंडळ योजना (५०% परवडणाऱ्या सदनिका): ४१ सदनिका
  • म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (भूखंड): ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+