"पगार कोण देतंय कानाखाली मारेल, बडतर्फ करेल!" या मंत्र्यांचं वक्तव्य! रोहीत पवारांकडून व्हिडिओ पोस्ट
Meghna Bordikar's controversial statement : राज्यात महायुती सरकारमधील मंत्र्यात बेताल वक्तव्य करण्याची स्पर्धाच लागली असून महायुती सरकारला अडचणीत आणण्याचाच हा प्रकार सुरु असल्याचे दिसते. आधी भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर, शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) माणिकराव कोकाटे आता मंत्री मेघना बोर्डीकर यांचा व्हिडिओ समोर आला आहे. या कथित व्हिडिओत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या ग्रामसेवकाला चक्क दम देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ रोहीत पवार यांनी पोस्ट केला आहे.
रोहीत पवार यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे आता या मंत्री अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. रोहीत पवार यांनी एका कार्यक्रमाचा व्हिडिओ जारी केला असून त्यात मंत्री कानाखाली मारण्याची भाषा करत असल्याचे वक्तव्य करत आहेत.

रोहीत पवार यांनी व्हिडिओसह एक पोस्टही केली आहे. "आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे, यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची" असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला आहे.
सभागृहात रम्मी खेळणारे…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 2, 2025
पैशांच्या बॅगा भरणारे…
डान्सबार चालवणारे…
आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे..
यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची…
सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट… pic.twitter.com/rRMbQsPHde
(वनइंडिया मराठी या व्हिडिओची खात्री करत नाही.)
काय आहे मेघना बोर्डीकर यांचे कथित वक्तव्य
रोहीत पवारांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत बोर्डीकर यांचे वक्तव्य असे की, "सालगड्यासारखं कुणाचं काम करायचं ना याद राख, मेघना बोर्डीकरचा शब्द आहे कानाखाली मारेल, पगार कोण देतंय. चमचेगिरी कुणाची करायची नाही. आताच्या आता बडतर्फ करेल याद राखा, काय कारवाया करतो मला माहीत नाही का? मी मुद्दाम सीईओ मॅडमला आज येथे बोलावले. हमली करायची ना तर सोडून दे नोकरी."
रोहीत पवारांची एक्सवर व्हिडिओसह पोस्ट
सभागृहात रम्मी खेळणारे...
पैशांच्या बॅगा भरणारे...
डान्सबार चालवणारे...
आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे..
यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची...
"सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात?
देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे."
कृपया यांना आवरा..!
काय म्हणाल्या राज्यमंत्री बोर्डीकर
रोहीत पवारांच्या आरोपावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या म्हणाल्या, "बोरीत मी एका कार्यक्रमात मी जे बोलले ते लोकांच्या भल्यासाठी बोलले व्हिडिओ पुर्ण बघायला हवा. घरकुलासंदर्भात विधवा, मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांना हा ग्रामसेवक त्रास देत होता. ज्या भाषेत कळते त्या भाषेत मी समज दिली. अर्धवट माहिती घेऊन विरोधकांनी जनतेची दिशाभूल करु नये. वारंवार तक्रार करुनही ग्रामसेवक ऐकत नसल्याने खडसावले आहे."












Click it and Unblock the Notifications