जरांगे, पोलिस अधीक्षकांच्या विंनतीवरुन धनंजय देशमुख यांचं आंदोलन मागे, खाली येताच अश्रू अनावर

Santosh Deshmukh murder case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रकरणी आरोपींवर कारवाईसाठी सुरु असलेलं चार तासापासून सुरु आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या विंनतीवरुन धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतलं आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार आरोपीला अद्याप अटक नाही. हत्याचा मास्टरमाइंड आणि खंडणीचा आरोपी वाल्मिक कराडवर सरकारने मोक्का कायदा लावावा या मागणीसाठी मस्साजोगचे गावकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

माझ्या कुटूंबाला जो पर्यंत न्याय मिळत नाही. त्यामुळे जिंवत राहून उपयोग नाही. माझ्या कुटूंबासाठी न्याय मागतोय, पण सरकारकडून जो हवा तो प्रतिसाद मिळत नाही. पोलिस अधिका-यांनी आपल्या तपासासाठी विश्वासात घेतलं नाही. मला कोणत्याही चौकशीसाठी पोलिसांकडून बोलवण्यात आलं नाही.

Santosh Deshmukh murder case

न्याय मागताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. मग कशासाठी न्याय मागू असा संतप्त सवाल संतोष देशमुख यांनी केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील एक आरोपी अद्याप आरोपी फरार आहे. तसेच इतर आरोपींवर मोक्का लावण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. मस्साजोगमधील ग्रामस्थांकडून सध्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात धनंजय देशमुख आक्रमक झाले आहेत.

धनंजय देशमुख यांनी टाकीवरुव खाली उतरण्यास नकार दिल्यामुळे गावात तणावग्रस्त परिस्थिती असून गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. पोलिसांना पाण्याच्या टाकीवर चढण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर जाणारी शिडी काढून ठेवली आहे. त्यामुळे पोलिसांना टाकीवर जाता येत नाही. आंदोलनस्थळी मनोज जरांगे पाटील दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी ही फोनवरुन संतोष देशमुख यांच्या बोलून खाली उतरण्याची विनंती केली आहे. मात्र धनंजय देशमुख यांनी खाली येण्यास नकार दिला आहे.

मस्साजोग गावात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाट आहे. पोलिस अधिक्षक आणि उपअधिक्षक आंदोलनास्थळली दाखल झाले आहे. पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत धनंजय देशमुख यांच्या संवाद साधून खाली उतरण्याची विनंती करण्यात आली आहे. स्वत : पोलिस उपअधिक्षक यांनी दुस-या टाकीवरुन चढून त्यांच्या संवाद सुरु केला आहे. यावेळी गावक-यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात येत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+