Marathwada MuktiSangram CM शिंदेंचे वक्तव्य, म्हणाले- मराठवाड्याच्या विकासासाठी हात आखडता घेणार नाही
Marathwada MuktiSangram Day 2024 : मराठवाडा हा निजामी जुलमी राजवटीतून मुक्त झाला. मराठवाडा स्वतंत्र होण्यासाठी अनेकांनी आपल्या जीवाची पर्वाही केली नाही. आगामी काळात मराठवाड्याचा मोठा विकास केला जाईल, देशाच्या विकासात मराठवाड्याचे मोठे योगदान आगामी काळात राहील म्हणूनच मराठवाड्याच्या विकासासाठी हात आखडता घेणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्मा स्मारक इथं ध्वजवंदन केले तसेच त्यांनी यावेळी मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी आहुती दिलेल्या हुतात्म्यांसह स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.

निजामाची जुलमी राजवट मोडून काढली
मराठवाडा मुक्तिसंग्रामासाठी हैदराबाद संस्थानातील मराठीजनांत स्वातंत्र्याची धग होती. मराठवाड्यातील मुर्तीसंग्रामात मराठवाड्यातील अनेकांनी आपले रक्त सांडलं. जुलमी निजामी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळावे यासाठी प्रयत्न केले. देशाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामी जुलमी राजवट मोडून काढत मराठवाडा स्वतंत्र केला असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मराठवाड्यात ठिकठिकाणी मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजवंदन
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जालना येथे टाऊन हॉल स्थित हुतात्मा स्मारकात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी पालकमंत्री सावे आणि मान्यवरांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर पालकमंत्री सावे यांनी जिल्हावासीयांना मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. माजीमंत्री आ. राजेश टोपे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर आदींची यावेळी उपस्थिती होती.












Click it and Unblock the Notifications