Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मरण पत्करायला तयार! आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून जाणार नाही- मनोज जरांगे! आझाद मैदानात उपोषण सुरु

Manoj Jarange's hunger strike begins at Azad Maidan in Mumbai :"मराठा आरक्षणासाठी मरण पत्करायला मी तयार आहे, आता मुंबईतून आरक्षण घेऊनच जाईल, तोपर्यंत उपोषण सुरु राहील." असे म्हणत मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा मुंबईतील आझाद मैदानात एल्गार पुकारला आहे.

"शांततेत आंदोलन करा, जो शांततेत आंदोलन करेल तोच आपला कार्यकर्ता आहे. तोच मराठ्यांचा, सरकारने आडकाठी आणली तर मग तुम्ही ऐकू नका, पण सरकार सहकार्य करत आहे तुम्ही कोण्या पक्षाचे कार्यकर्त्यांचे ऐकता आणि मराठ्यांना डाग लावता मग तुमची जबाबदारी आमची नाही," असे म्हणत मनोज जरांगे यांनी मुंबईतील आंदोलनाचा आपला पावित्रा स्पष्ट केला.

Manoj Jaranges hunger strike begins

आरक्षण भेटल्याशिवाय मी मागे हटणार नाही - जरांगे

आरक्षण भेटल्याशिवाय मी मागे हटणार नाही, मुंबई सोडणार नाही. सरकारसोबत चर्चेचा मार्ग मोकळा आहे, असे म्हणत जरांगेंनी सरकारला अप्रत्यक्ष आवाहन केले आहे.

Take a Poll

आझाद मैदानात मोठी गर्दी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल झाले आहेत. त्यानंतर काही मिनिटं आंदोलकांना संबोधन केले. दरम्यान आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण आंदोलन सुरू झाले आहे. आझाद मैदान आंदोलकांनी तुडुंब भरले आहे. आझाद मैदानाच्या बाहेर तसेच पालिका मुख्यालयाचा परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली आहे.

मुंबईत आंदोलक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. फ्री- वे वर आंदोलकांच्या सर्व गाड्या पोलिसांनी थांबविण्याल्या आहेत. त्यामुळे आंदोलन पायी चालत आझाद मैदानात दाखल होत आहेत. आंदोलकांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोरील रस्त्याचा ताबा घेतला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

सुमारे तीन हजार गाड्यांचा ताफा मुंबईत दाखल

आज सुमारे तीन हजार गाड्यांचा ताफा मुंबईत दाखल झाला आहे. जरांगे पाटील यांच्या गाड्यांचा ताफा आझाद मैदानात दाखल झाला आहे. 5 हजार लोकांनाच आझाद मैदानात प्रवेश दिला जाणार असे पोलिसांनी आंदोलकांना सांगितले होते. मात्र आता आंदोलकांची गर्दी आझाद मैदानाबाहेर वाढत चालले आहे हा मोर्चा हा बीड येथून निघून नवी मुंबई मार्गे सायन- पनवेल मार्गाने पांजरपोळ मार्गे मोटार कार व इतर वाहने घेवून आझाद मैदानात दाखल झाला आहे.

या मार्गावर वाहनांना मज्जाव

  • लोक हे पायी, मोटर सायकल, मोटर कार, टेम्पो, ट्रक इत्यादी वाहनांनी आझाद मैदानात दाखल होत आहेत. त्यामुळे आंदोलकांची संख्या प्रचंड वाढत आहे वाशी कडुन येणाऱ्या पांचरपोळ-फ्रीवेकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध आहे.
  • भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले मार्गाकडुन ट्रॉम्बेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध आहे. छेडानगर वरून फ्रीवेला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+