Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मनोज जरांगे यांना तातडीने रुग्णालयात हलवले; उपचार करणाऱ्या डाँक्टरांचे म्हणणे आहे की...

संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या जालन्यातील मोर्चाला आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची उपस्थिती होती. मात्र याच मोर्चात त्रास जाणवू लागल्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

Manoj Jarange Pati

जरांगे यांना काय झाले?

जालना येथे आज सकल मराठा समाज आणि मराठा संघटनांकडून जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील, दीपक केदार यांच्यासह समाज बांधव सहभागी झाले होते. परंतु या मोर्चात मनोज जरांगे यांचे भाषण झाले नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खराब असल्याने त्यांनी भाषण केले नाही. माझी तब्येत खालावली आहे, असे त्यांनी स्वतः सांगितले होते. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांना उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

डाँक्टरांचे म्हणणे काय?

मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत बिघडलेली असतानाही ते आज मोर्चात पायी चालले. त्यांनंतर त्यांना थकवा जाणवू लागला. थकवा जाणवत असल्याने त्यांनी भाषण केले नाही. यानंतर मात्र त्रास जास्त जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर प्रदीप चावरे यांनी जरांगे पाटील रक्तदाब कमी असल्याचे सांगितले. पाठदुखीच्या वेदना जास्त वाढल्याने तातडीने सिटी स्कॅन करण्यात आले. आता रिपोर्ट आल्यावर त्यांच्यावर पुढील रिपोर्ट आल्यावर उपचार केले जाणार आहेत.

जरांगे पाटील हैराण

सध्या मनोज जरांगे पाटील यांची कंबर दुखत आहे. तसेच त्यांची पाठही दुखत आहे. या वेदनेमुळेच त्यांचा रक्तदाब कमी झाल्याचे सांगितले गेले. त्यांना पायऱ्या चढायला उतरायला त्रास होत आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असले तरी त्यांनी उद्या धाराशिवमध्ये मोर्चाला जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+