Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'..तेव्हा तू कुठे झोपली..मेXX होतीस?', जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांसह चित्रा वाघ यांना धुतलं..!

manoj jarange patil attack on devendra fadnavis chitra wagh : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी अंतरवाली सराटी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपल्यावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवर आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या आईबद्दल केलेल्या कथित वक्तव्यावर स्पष्टीकरण देत भाजप नेत्या चित्रा वाघ यांना थेट इशारा दिला.

'आई'च्या सन्मानावरून फडणवीसांना आव्हान

जरांगे पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर प्रथम खुलासा केला. 'मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल काहीही बोललो नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले. 'मी त्यांच्या आईवर कुठे आणि केव्हा बोललो? परंतु, बोलण्याच्या ओघातून माझ्या तोंडातून तसा काही शब्द गेला असेल तर तो मी माघारी घेईन,' अशी नरमाईची भूमिका घेत त्यांनी तत्काळ विषय संपवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, याच वेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. "देवेंद्र फडणवीस, तुला लाज वाटली पाहिजे, तू मुख्यमंत्री आहेस. ज्या पोलिसांना सस्पेंड करायला पाहिजे होते, त्यांना तू मोठी पदं दिली. पोलिसांनी आमच्या आई-बहि‍णींना मारले तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या," असे गंभीर आरोप त्यांनी केले.

त्यांनी भावनिक साद घालत आरक्षण आणि माता-पित्याचा सन्मान यांची सांगड घातली. "तुझी आई तुला प्रिय आहे तशी आम्हाला आमची आई प्रिय आहे. तू मराठ्यांना आरक्षण दे, तुझ्या आईची पूजा करतो," असे थेट आव्हान जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना दिले.

Manoj Jarange Patil

'आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा तू कुठे होतीस?'

मनोज जरांगे पाटील यांच्या विधानानंतर चित्रा वाघ, प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. चित्रा वाघ यांनी जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली, असा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत निशाणा साधला.

जरांगे म्हणाले की, "ती जी बाई बोलली, कोण वाघीण, तिला आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तेव्हा दिसलं नाही का?" असा संतप्त सवाल त्यांनी केला. जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांना विचारले की, "तेव्हा तू कुठे मे**$, आमच्या तीन-चार वर्षांच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा तू झोपली होतीस का?"

या वेळी त्यांनी 'जाती'वरूनही टीका केली. "आता तुझी जात जागी झाली. कवर तू खेटरं चाटतेस, माझ्या नादी तू लागू नकोस," असे आक्षेपार्ह विधान जरांगे यांनी केले. त्यांनी चित्रा वाघ यांना थेट धमकी दिली, "तू माझ्या नादी लागू नकोस. माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन. संध्याकाळपर्यंत तुझी सगळी माहिती माझ्याकडे येईल."

कायद्याच्या कलमाचा इशारा

जरांगे पाटील यांनी महिलांवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करत चित्रा वाघ यांना कायद्याचा इशारा दिला. "तू बाई असशील तर आमच्याकडेही बाया आहेत. आमच्या आईवर ३०७ ची केस लागली, तुझ्यावर तशी केस केली तर चालेल का?" असा सवाल त्यांनी विचारला.

आंदोलनाची दिशाही केली स्पष्ट!

या वादग्रस्त पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाची पुढील दिशाही स्पष्ट केली. मराठा आरक्षणासाठी २७ ऑगस्टला मराठा मोर्चा मुंबईकडे कूच करेल, अशी घोषणा त्यांनी केली.

मनोज जरांगे पाटील यांच्या या अत्यंत आक्रमक आणि व्यक्तिगत टीका करणाऱ्या वक्तव्यांवर आता भाजप नेत्या चित्रा वाघ काय प्रत्युत्तर देणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिकच राजकीय आणि भावनिक वळणावर पोहोचला आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+