मनोज जरांगे यांचे उपोषण पुन्हा सुरु
Mumabi: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आग्रही असलेले मनोज जरांगे यांनी आपल्या उपोषणाला पुन्हा प्रारंभ केला आहे. यावेळी आरक्षण न दिल्यास आगामी विधानसभा निवडणूक लढण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी काही महिन्यांपूर्वी उपोषण सुरु केले होते. त्यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला आणि मराठा आरक्षण आंदोलन तापले. मनोज जरांगे यांच्याशी सरकारच्या शिष्टमंडळे तसेच राज्यातील महत्वाच्या नेत्यांनी भेटी दिल्या.

त्यांच्या मागणीची दखल घेऊन मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र त्यानेही समाधान न झाल्याने जरांगे यांनी मुंबईच्या दिशेने महामोर्चा काढला. सरकारने घाईघाईने मराठा आरक्षण दिले. त्यानंतर विशेष अधिवेशन बोलावून १० टक्के आरक्षण दिले. मात्र अजूनही जरांगे यांचे समाधान झालेले नाही.
लोकसभा निवडणुकीच्या काळात जरांगे यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र त्यांची भूमिका लोकसभा निवडणुकीत महत्वाची ठरली होती. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर त्यांनी पुन्हा उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
रंगला जरांगे- भुजबळ संघर्ष
जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा संघर्ष रंगला होता. जरांगे यांच्या सभांना प्रतिसभा घेऊन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले होते. तेव्हा नाशिकमध्ये भुजबळ यांना पाडण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला होता. या घटनांचे हिंसक पडसाद विशेषतः बीड जिल्ह्यात उमटले होते.
तिथे ओबीसी समाजाची दुकाने आणि घरे जाळल्याचा आरोप भुजबळ यांनी केला होता. जरांगे यांच्या आंदोलनाच्या आडून विरोधक राजकारण करीत आहेत. काही राजकीय नेत्यांच्या कारखान्यांनी आंदोलकांना इंटरनेट सुविधा दिली तर काही नेत्यांनी वार रूम उघडून देण्यास सहकार्य केल्याचा दावा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
ग्रामस्थांचा विरोध
आपल्या इशाऱ्याच्या अनुसार जरांगे यांनी उपोषण आंदोलनाला प्रारंभ केला आहे. मात्र त्यांच्या आमरण उपोषणाला स्थानिक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटी, वाडीगोद्री आणि वडगाव या ग्रामस्थांचा विरोध असल्याचे गोंडी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
शिंदे, फडणवीस यांना इशारा
पोलिसांनी उपोषण आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी जरांगे आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. यावेळी आपल्या उपोषण आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांच्या बाबतीत आगळीक केल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक










Click it and Unblock the Notifications