कृषिमंत्र्यांच्या रमी व्हिडिओप्रकरणी नवा ट्विस्ट; आव्हाडांचे आणखी व्हिडीओ, कोकाटेंची कोंडी वाढली!

विधिमंडळाच्या सभागृहात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे रमी हा पत्त्यांचा खेळ खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना कृषिमंत्र्यांच्या कथित ऑनलाइन जुगाराच्या या प्रकारामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असताना, कोकाटेंनी मात्र आपण जुगार खेळत नसल्याचा दावा केला होता. "मी केवळ मोबाईलवरील जाहिरात स्किप करत होतो," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. मात्र आता राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोकाटेंचे आणखी काही व्हिडीओ समोर आणले आहेत. या नव्या पुराव्यांमुळे कृषिमंत्र्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

manikrao kokate rummy

आव्हाडांनी ट्विटद्वारे केले गंभीर आरोप

जितेंद्र आव्हाड, जे गेल्या काही दिवसांपासून कोकाटेंवर टीका करत आहेत, त्यांनी नुकतेच आपल्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर कोकाटेंचे नवे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, "एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे, प्रश्नोत्तरे सुरू आहेत आणि दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे 'जंगली रमी' खेळत होते. त्यांच्या पहिल्या व्हिडीओबद्दल 'ती फक्त जाहिरात होती' असे सांगितले जात होते. आता मी हे दोन व्हिडीओ देतोय. दोन्ही व्हिडीओ व्यवस्थित बघा." आव्हाडांनी महाराष्ट्राचा जुगाराचा डाव झाल्याचा गंभीर आरोप करत कोकाटेंवर हल्लाबोल केला आहे.

'पत्ते सरकवण्याचे' स्पष्टीकरण द्या!

आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये, "कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे या व्हिडीओत स्पष्ट दिसेल. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाइन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा," असा सवाल विचारला आहे. त्यांनी कोकाटे ऑनलाइन जुगारच खेळत असल्याचा दावा करत, "तुम्ही मागाल तेवढे पुरावे देईन," असे थेट आव्हान दिले आहे. यामुळे, या नव्या व्हिडीओ क्लिप्सबद्दल माणिकराव कोकाटे आता काय स्पष्टीकरण देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी कायम

कोकाटे यांचा विधिमंडळातील व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे. विशेष म्हणजे, खासदार सुनील तटकरे यांनी कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील, असे सूचक विधान केले आहे, ज्यामुळे या प्रकरणाला अधिक राजकीय रंगत आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+