Makar sankranti 2026 मकर संक्रांतीला हळदी-कुंकवासाठी 10 स्वस्त अन् मस्त 'वाण'; बजेट फक्त ₹ 50 ते 100
Makar sankranti 2026 haldi kumkum vaan ideas : मकर संक्रांत म्हटलं की महिलांची लगबग सुरू होते ती हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाची. या सणाला सुवासिनींना 'वाण' देण्याची प्राचीन परंपरा आहे. मात्र, सध्याच्या महागाईच्या काळात प्रत्येक पाहुण्याला काय द्यावे, असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ५० ते १०० रुपयांच्या आत मिळणारे १० असे पर्याय, जे स्वस्त तर आहेतच पण प्रत्येकाच्या उपयोगीही पडतील. स्टीलच्या भांड्यांपासून ते इको-फ्रेंडली रोपांपर्यंतच्या या हटके आयडिया तुमचे बजेट न कोलमडता सणाचा आनंद द्विगुणित करतील.

Makar sankranti 2026 : मकर संक्रांत विशेष: १० स्वस्त आणि उपयुक्त वाण
१. स्टीलचे छोटे डबे किंवा वाट्या स्वयंपाकघरात स्टीलच्या वस्तू नेहमीच उपयोगी पडतात. छोट्या आकाराचे मसाले डबे किंवा चटणीसाठीच्या वाट्या होलसेल मार्केटमध्ये घेतल्यास स्वस्त पडतात.
अंदाजे किंमत: ₹४० ते ₹६० प्रति नग.
२. काचेचे बाऊल्स (Glass Bowls) सध्या काचेच्या भांड्यांना खूप मागणी आहे. डेझर्ट किंवा सॅलड सर्व्ह करण्यासाठी एक छोटा काचेचा बाऊल हे एक प्रीमियम आणि स्वस्त वाण ठरू शकते.
अंदाजे किंमत: ₹३० ते ₹५० प्रति नग.
३. हॅन्ड बॅग ऑर्गनायझर किंवा पाऊच : पैसे, चाव्या किंवा मेकअपचे साहित्य ठेवण्यासाठी कापडी किंवा लेदर फिनिश असलेले पाऊच महिलांसाठी अतिशय उपयुक्त ठरतात.
अंदाजे किंमत: ₹३५ ते ₹७० प्रति नग.
४. सिरॅमिक कॉफी मग : वेगवेगळ्या रंगात आणि डिझाईन्समध्ये मिळणारे कॉफी मग दिसायला आकर्षक असतात. ऑफिस किंवा घरी वापरण्यासाठी हे उत्तम वाण आहे.
अंदाजे किंमत: ₹४५ ते ₹८० प्रति नग.
५. सुगंधी अगरबत्ती किंवा धूप स्टिक सेट : देवासमोर किंवा घरात सुगंधी वातावरण राहण्यासाठी चांगल्या ब्रँडचा अगरबत्तीचा मोठा पॅक किंवा धूप स्टिकचा बॉक्स देता येतो.
अंदाजे किंमत: ₹५० ते ₹९० प्रति पॅक.
६. इनडोअर प्लांट्स (छोट्या कुंडीसह) : आजकाल 'इको-फ्रेंडली' वाण देण्याची पद्धत वाढली आहे. मनी प्लांट किंवा तुळशीचे छोटे रोप देण्यावर अनेकांचा भर असतो.
अंदाजे किंमत: ₹४० ते ₹१०० (नर्सरीनुसार).
७. किचन टॉवेल किंवा नॅपकिन सेट : मल्टीकलर मायक्रोफायबर नॅपकिन्स स्वयंपाकघरातील कामांसाठी उपयुक्त असतात. हे वाण कधीही वाया जात नाही.
अंदाजे किंमत: ₹३० ते ₹६० प्रति जोड.
८. सुका मेवा छोटे पॅकेट : एखादी वस्तू देण्याऐवजी काजू, बदाम किंवा पिस्त्याचे छोटे आकर्षक पॅकेट तयार करून वाण म्हणून देता येते. हे आरोग्यासाठीही उत्तम आहे.
अंदाजे किंमत: ₹६० ते ₹९० प्रति पाकीट.
९. प्लॅस्टिक एअरटाईट कंटेनर : डाळी किंवा फ्रिजमध्ये वस्तू ठेवण्यासाठी छोटे एअरटाईट डबे प्रत्येक गृहिणीला लागतात.
अंदाजे किंमत: ₹३० ते ₹५० प्रति नग.
१०. तोरण किंवा दाराचे शुभ-लाभ हँगिंग : घराच्या मुख्य दारासाठी मोत्याचे किंवा गोंड्याचे छोटे तोरण किंवा 'शुभ-लाभ' लिहिलेले आकर्षक हँगिंग संक्रांतीला शुभ मानले जाते.
अंदाजे किंमत: ₹५० ते ₹८० प्रति जोडी.
(टीप: वरील किमती तुम्ही किती नग खरेदी करता आणि कोणत्या मार्केटमधून (रिटेल की होलसेल) घेता यावर अवलंबून कमी-जास्त होऊ शकतात.)












Click it and Unblock the Notifications