Makar sankranti 2026 : घराचे अंगण सजवा या आकर्षक रांगोळी डिझाइन्सनी; पाहा सोप्या आणि सुंदर आयडियाज!

Makar sankranti 2026 best rangoli designs : मकर संक्रांत हा सण सूर्यदेवाच्या उपासनेचा आणि मांगल्याचा उत्सव आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हापासून मांगल्याचे दिवस सुरू होतात. भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्याला किंवा सणाला घरासमोर रांगोळी काढण्याची परंपरा आहे. रांगोळी केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून ती घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुख-समृद्धि घेऊन येते, अशी श्रद्धा आहे. यंदा मकर संक्रांतीनिमित्त तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी आम्ही काही खास आणि सोप्या रांगोळी डिझाइन्स घेऊन आलो आहोत.

१. फुलांची रांगोळी (Flower Rangoli)

Makar sankranti 2026 best rangoli designs

कमी वेळात आणि सुबक दिसणारी रांगोळी हवी असेल, तर झेंडूची फुले आणि गुलाबाच्या पाकळ्या वापरून 'संस्कार भारती' पद्धतीची रांगोळी काढा. मध्यभागी दिवा लावल्यास ही रांगोळी रात्रीच्या वेळी अधिक उठून दिसेल.

२ . सूर्य देवता रांगोळी (Sun Theme Rangoli)

Makar sankranti 2026 best rangoli designs

संक्रांतीला सूर्य पूजेचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही रांगोळीच्या मध्यभागी सूर्यदेवाची प्रतिकृती काढू शकता. यासाठी पिवळा, नारंगी आणि लाल रंगांचा वापर करा. सूर्याच्या किरणांना अधिक आकर्षक बनवण्यासाठी फुलांच्या पाकळ्यांचाही वापर करता येईल.

३. पतंग आणि फिरकी डिझाइन (Kite Design)

Makar sankranti 2026 best rangoli designs

संक्रांत म्हटली की डोळ्यांसमोर येतात ते आकाशात उडणारे रंगीबेरंगी पतंग. तुमच्या रांगोळीत निळा, हिरवा, गुलाबी अशा विविध रंगांचे पतंग आणि त्यांना जोडणारी दोरी (मांजा) काढा. ही डिझाइन दिसायला आधुनिक आणि सणाच्या उत्साहाला साजेशी दिसते.

४. मोर आणि निसर्ग (Peacock Rangoli)

Makar sankranti 2026 best rangoli designs

जर तुम्हाला थोडी मोठी रांगोळी काढायची असेल, तर मोराची आकृती सर्वोत्तम आहे. हिरव्या आणि निळ्या रंगांच्या छटा वापरून काढलेला मोर घराच्या प्रवेशद्वाराची शोभा वाढवेल. यात 'तिळगूळ घ्या, गोड बोला' असा संदेशही तुम्ही लिहू शकता.

५. हळदी-कुंकू आणि सुगडाची रांगोळी

Makar sankranti 2026 best rangoli designs


महाराष्ट्रात संक्रांतीला हळदी-कुंकू आणि सुगडाच्या पूजेला महत्त्व आहे. रांगोळीमध्ये ऊस, मातीची सुगडी, तिळगुळाची वाटी आणि हळदी-कुंकवाचा करंडा अशा पारंपरिक गोष्टी रेखाटल्यास ती अतिशय शुभ मानली जाते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+