Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Makar sankranti wishes पती-पत्नी, प्रियकर प्रेयसीसाठी प्रेमाचा गोडवा वाढवणारे मकर संक्रांतीचे संदेश

Makar Sankranti 2026 30+ Romantic Wishes & Messages : मकर संक्रांत हा सण केवळ निसर्गाच्या परिवर्तनाचा नाही, तर नात्यांमधील गोडवा जपण्याचाही सण आहे. "तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला" म्हणत आपण आपल्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देऊन हा सण अधिक खास बनवू शकतो. तुमच्या आयुष्यातील जोडीदारासाठी खास निवडक ३० शुभेच्छा संदेश खालीलप्रमाणे आहेत.

Makar Sankranti 2026 30  Romantic Wishes

पती-पत्नीसाठी शुभेच्छा संदेश (Wishes For Husband/Wife)

  • १. आयुष्याच्या प्रवासात तुझी साथ म्हणजे तिळगुळाचा गोडवा, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!
  • २. तिळगुळाचा गोडवा आणि आपल्या प्रेमाची उब, अशीच राहो जन्मोजन्मी. हॅप्पी संक्रांत!
  • ३. तू सोबत असली की प्रत्येक सण खास असतो. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा, बायको!
  • ४. माझ्या आयुष्यात आनंदाची पतंग उंच उडवणाऱ्या माझ्या प्रिय पतीला संक्रांतीच्या शुभेच्छा.
  • ५. तिळासारखे स्नेहबंध आणि गुळासारखा गोडवा, आपल्या संसारात असाच वाढू दे.
  • ६. काळी साडी आणि तुझे सौंदर्य... आजचा दिवस खरोखरच खास आहे. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
  • ७. संक्रांतीच्या या शुभ दिनी, आपल्या नात्यातील प्रेम सूर्यासारखे तेजस्वी राहो.
  • ८. तू माझ्या आयुष्यातील 'गुळ' आहेस, ज्याने माझे आयुष्य गोड केले आहे. शुभेच्छा!
  • ९. या संक्रांतीला बाधून घेऊया प्रेमाची गाठ, सुख-दुःखात सोबत चालूया आयुष्याची वाट.
  • १०. आपल्या आयुष्यात सुखाचे तिळगुळ सदैव विरघळत राहो. हॅप्पी मकर संक्रांत!
  • ११. पतंग उडताना जशी आकाशाला स्पर्श करते, तसेच तुझे प्रेम माझ्या हृदयाला स्पर्श करते.
  • १२. संक्रांतीचा सण, आनंदाचा क्षण, माझ्या प्रिय जोडीदाराला शुभेच्छांचे अर्पण!
  • १३. नातं आपलं तिळगुळासारखं असावं, कठीण काळातही साथ देणारं असावं.
  • १४. माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस तू गोड केला आहेस, तुला संक्रांतीच्या खूप शुभेच्छा.
  • १५. तिळगुळ घ्या गोड बोला... पण माझ्याशी नेहमीच गोड बोलत जा! शुभेच्छा!

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडसाठी शुभेच्छा संदेश (wishes For GF/BF)

  • १६. तुझ्याशी असलेलं माझं नातं या तिळगुळापेक्षाही जास्त गोड आहे. हॅप्पी संक्रांत!
  • १७. माझ्या मनाच्या आकाशात तुझ्या नावाचा पतंग नेहमी उंच उडत राहो. आय लव्ह यू!
  • १८. तिळगुळ तर फक्त निमित्त आहे, मला तर तुझ्या प्रेमाचा गोडवा हवा आहे.
  • १९. संक्रांतीच्या शुभेच्छा! आपल्या प्रेमाचा दोर कधीही तुटू नये, हीच प्रार्थना.
  • २०. आज तिळगुळ खाताना तुझी आठवण आली, कारण तुझ्यासारखी गोड वस्तू जगात दुसरी नाही.
  • २१. तुझे प्रेम म्हणजे माझ्या आयुष्यातील संक्रांतीची उबदार सकाळ. शुभेच्छा प्रिय!
  • २२. चला, या संक्रांतीला जुने वाद विसरूया आणि प्रेमाचा नवीन तिळगुळ खाऊया.
  • २३. तुझी साथ म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
  • २४. यंदाच्या संक्रांतीला तुझ्या आयुष्यातला सगळा दुरावा निघून जावो आणि फक्त प्रेम उरो.
  • २५. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि आयुष्याचा तिळगुळ झाला! थँक्स फॉर बीईंग विथ मी.
  • २६. आकाशातल्या पतंगासारखं आपलं प्रेमही मुक्तपणे विहार करू दे. शुभेच्छा!
  • २७. तुला संक्रांतीच्या शुभेच्छा देण्याचा पहिला मान माझाच असायला हवा!
  • २८. आयुष्याच्या पतंगाची चक्री तुझ्या हातात आहे, आता तूच ठरव किती उंच उडायचं!
  • २९. गोड गोड संक्रांतीच्या माझ्या गोड गोड गर्लफ्रेंडला/बॉयफ्रेंडला खूप शुभेच्छा.
  • ३०. तीळ आणि गूळ जसे एकत्र असतात, तसंच आपणही नेहमी सोबत राहूया.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+