Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'माझी लाडकी बहिण' योजनेचे 3 हजार रुपये प्राप्त होताच साऱ्या बहिणींना आनंदी आनंद!

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील महिलांचं उथ्थान आणि विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात माझी लाडकी बहिण योजना आणली. या याजनेद्वारे महिलांना दीड हजार रुपये महिन्याला मिळत असून पहिले दोन महिन्यांचे 3 हजार रुपये खात्यात येताच महिलांना खूप आनंद झाला आहे.

आपल्या हक्काचे, सन्मानाचे पैसे मिळाल्यानंतर साऱ्या महाराष्ट्रात महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असलेल्या ऐन रक्षाबंधन सणाआधीच खात्यात पैसे येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकाबद्दल महिला भरभरुन बोलत आहेत, आपल्या या लाडक्या भावाचेही त्या आभार मानत आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana beneficiaries get happy all over Maharashtra  Maharashtra News


भाऊ म्हणुन मुख्यमंत्री शिंदे निभावत आहेत कर्तव्य

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही महत्वकांक्षी योजना महिला आणि बालकल्याण विभागामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार राबवत आहे. या योजनेसाठी महाराष्ट्रातील महिलांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत असून राज्य सरकारकडून आपले वचन पूर्ण करण्याचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला.

Majhi Ladki Bahin Yojana beneficiaries get happy all over Maharashtra  Maharashtra News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धडाडीच्या निर्णयामुळे लोकप्रियता वाढ असून राज्यातील जनेतला हे आपल्याच कुटुंबातील मुख्यंत्री वाटतात. कुटुंबतील भाऊ म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माझी लाडकी बहिण योजनेद्वारे आपल्या लाडक्या बहिणीसाठी भावाचे कर्तव्य निभावले आहे.

महाराष्ट्रात आनंदी-आनंद, महिलांकडून कृतज्ञता व्यक्त

राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, पुरस्थिती आणि नुकसानीचा सामना करत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने राज्यातील जनतेच्या दुखाःवर फुंकर घालण्याचे काम केले आहे. माझी लाडकी बहिण योजनेचे 2 महिन्यांचे 3 हजार रुपये लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात रक्षाबंधनाआधी देण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होते, आणि त्यांनी हे लक्ष्य पुर्ण करत महिलांच्या खात्यात पैसे पाठवले, रक्षाबंधनाआधीच ओवाळणी मिळाल्यान संपूर्ण महाराष्ट्रातील महिला आनंद साजरा करत आहेत. ठिकठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बहिणी कृतज्ञता व्यक्त करत आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana beneficiaries get happy all over Maharashtra  Maharashtra News

शिंदे यांचे सरकार भक्कपपणे महिलांच्या मागे

महायुतीचे सरकार हे गोरगरीबांचे सरकार आहे, या सरकारने माझी लाडकी बहिण योजना आणली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणानुसार हे सरकार महिलांचे उत्थान करत असून राज्यातील महिला धोरणांवरही सरकार काम करत आहे. हे सरकार महिलांच्या पाठीशी भक्कम उभे आहे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी सांगितले आहे.

Majhi Ladki Bahin Yojana beneficiaries get happy all over Maharashtra  Maharashtra News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशीही आता महिला बहिण म्हणून भक्कमपणे उभ्या राहत असून त्यांचा या सरकारला पाठिंबा मिळत आहे, आमच्या समस्या जाणून आमच्या विकासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हे सरकार काम करत असल्याचे अनेक महिलांच्या प्रतिक्रीया आहेत.

40 हजार गाव अन् 1 कोटी राख्या!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेनंतर महिलांनी आपल्या मुख्यमंत्री भावाविषय कृतज्ञता व्यक्त केलीच पण रक्षाबंधनाच्या सणानिमित्त शेकडो बहिणींणी औक्षण करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राख्या बांधल्या. राज्यातील 40 हजार गावांतून मुख्यमंत्री शिंदे यांना एक कोटी राख्या पाठविण्यात आल्या आहेत. या संकल्पाची सुरुवात 19 ऑगस्टपासून झाली आहे.

Majhi Ladki Bahin Yojana beneficiaries get happy all over Maharashtra  Maharashtra News

दरम्यान, "माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठं योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे-जे करता येईल ते करेन. आमची ताकद जसजशी वाढत जाईल, तशी आर्थिक मदतही वाढवली जाईल," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बहिणींना रक्षाबंधनानिमित्त आश्वासनही दिले आहे.

1 कोटी 4 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले

माझी लाडकी बहिण योजेनेची खात्यात टाकलेली दोन महिन्यांची रक्कम केवळ रक्षाबंधनाची ओवाळणी नाही, तर माहेरचा कायमचा आहेर आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहिण योजनेचे दोन हप्ते रक्षाबंधनापूर्वी माझ्या बहिणींच्या खात्यात जमा व्हावेत, असा आमचा प्रय़त्न होता, तो शब्द आम्ही पाळला. राज्यातील 1 कोटी 4 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana beneficiaries get happy all over Maharashtra  Maharashtra News

अन्य महिलांच्या खात्यातही हळूहळू आधार सीडिंग आणि तांत्रिक बाबी पूर्ण होताच, पैसे जमा होतील. यातून माझ्या बहिणींच्या संसाराला थोडाफार आर्थिक हातभार लागेल, ही आमची भावना आहे", असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना आश्वासन दिलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+