महावितरण देणार वीज बील थकवणाऱ्या ग्राहकांना 'झटका'! वसुली वाढवणार; ऑनलाईन बिल कसे भरायचे? घ्या समजून
Mahavitaran to increase overdue electricity bill collection campaign : राज्यातील थकीत वीज बिल असलेले ग्राहक आणि अवैधपणे वीज वापरणाऱ्यांना महावितरण झटका देण्याच्या तयारीत आहे. वीज खंडीत होण्याचे प्रकार पाहता महावितरण करवाई वेगाने करत असून वाढती वीज बिल थकबाकी पाहता वीज बील वसुलीला गती द्यावी अशा सूचना महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिले आहेत.
राज्यात सध्या पावसाळा असून विजेची मागणी स्थीर आहे. त्यामुळे विजपुरवठा सुयोग्य रितिने सुरु आहे. दरम्यान, महावितरण अध्यक्षांनी बैठक घेतली. या बैठकीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा देणे, वीज बिल वसुली मोहीम आणि वीज चोरीवर आळा यासंदर्भात अध्यक्षांनी सूचना दिल्या आहेत.

ई-सकाळच्या वृत्तानुसार, पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिक वसाहतींसह सर्व भागात वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे वारंवार वीज खंडित होणाऱ्या प्रकारांची गंभीर दखल घेण्यात येत आहे. वाढती थकबाकी कमी करण्यासाठी वीज बिलांच्या वसुलीला आणखी वेग द्यावा, अशा सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिल्याचे याबाबतच्या वृत्तात नमूद आहे.
15 टक्के ग्राहकांची वीज पुरवठा कापला
प्राप्त माहितीनुसार, पुणे प्रादेशिक विभागात वीजबिलांच्या थकबाकीमुळे 15 टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. प्रत्येक विभागात कायमस्वरूपी वीज खंडित असलेल्या वीजजोडण्यांची तपासणी मोहीम सुरू करुन वीजचोरी आढळल्यास कारवाई करण्याचे आदेशही चंद्र यांनी दिले आहेत.
बैठकीत काय दिल्या सूचना?
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत काही खास सूचना महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, त्या खालीलप्रमाणे
- ग्राहकांच्या अडचणी समजून घ्या आणि त्यांना वेळोवेळी आवश्यक मदत करा.
- वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे, ही गंभीर बाब असून याकडे लक्ष द्यावे.
- सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ताबडतोब उपाययोजना कराव्यात, नागरिकांना त्रास होऊ नये.
- देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी वीज बंद ठेवण्याचा कालावधी कमी करावा.
- महावितरणच्या महसूलवाढीसाठी नवीन ग्राहकांचे स्वागत करा.
ऑनलाईन वीज बील कसे भरावे प्रक्रिया समजून घ्या?
स्टेप्स 1 : महावितरणच्या अधिकृत वेबसाइट (www.mahadiscom.in) भेट द्या.
"ग्राहक पोर्टल" (Consumer Portal) वर क्लिक करा.
"Online Bill Payment" किंवा "वीजबिल भरणा" पर्याय निवडा.
स्टेप्स 2 : खाते क्रमांक आणि तपशील प्रविष्ट करा:
तुमचा ग्राहक क्रमांक (consumer number) आणि इतर आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
तुम्ही भरणा करू इच्छित असलेल्या महिन्याचे बिल निवडा.
स्टेप्स 3 : पेमेंट पर्याय निवडा
तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI (Google Pay, PhonePe, Paytm इ.) यांसारख्या पर्यायांपैकी एक निवडू शकता.
स्टेप्स 4 : पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा:
तुमची पसंतीची पेमेंट पद्धत निवडल्यानंतर, तुम्हाला तुमच्या बँकेच्या किंवा पेमेंट गेटवेच्या पेजवर रीडायरेक्ट केले जाईल.
तुमची पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक माहिती भरा आणि पेमेंट करा.
स्टेप्स 5 : पेमेंटची पावती जतन करा:
पेमेंट यशस्वी झाल्यावर, तुम्हाला एक पावती (receipt) मिळेल.
तुम्ही ती पावती जतन करून ठेवा.
पर्यायी पद्धतीचाही अवलंब करु शकता
तुम्ही महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे देखील वीजबिल भरू शकता.
तुम्ही विविध ऑनलाइन पेमेंट ॲप्स (PhonePe, Paytm, Google Pay इ.) किंवा वेबसाइट्सद्वारे देखील वीजबिल भरू शकता.












Click it and Unblock the Notifications