Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना आज पाऊस झोडपणार! अमरावती, चंद्रपूरला ऑरेंट अलर्ट, हवामान अंदाज वाचा

Maharashtra Weather Rain likely in most districts : महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढत असून हा जोर १९ ऑगस्टपर्यंत राहणार आहे. आज कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर सोळा ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम मध्य आणि उत्तर-आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा किनाऱ्यावरील वायव्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र त्याच प्रदेशात कायम आहे. हे वादळ पुढील ४८ तासांत ते उत्तर-आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा किनारपट्टीवर सरकण्याची शक्यता आहे. आदी कारणांमुळे १३ ऑगस्टपासून १९ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात पावसाच्या प्रमाणात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Rain likely in most districts

अमरावती, चंद्रपूरला ऑरेंट अलर्ट

हवामान विभागाने काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे, त्यानुसार अमरावती व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना आज येलो अलर्ट

15 ऑगस्ट म्हणजेच आज महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. यासह पुणे, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागाला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज

आज 15 ऑगस्ट रोजी पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाजाचा विचार करता आकाश सामान्यता ढगाळ राहून हलक्या ते अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर तीन ते चार दिवस दिवसानंतर आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत कशी राहील स्थिती

मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज

शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पावसासह आकाश साधारणपणे ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३०°C आणि २५°C च्या आसपास असेल.

महाराष्ट्रासाठी मुंबई हवामान विभागाचा अंदाज काय?

कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Maharashtra Rain Today राज्यात आज वादळी वाऱ्यांसह होणार पाऊस 'ही' तारीख लक्षात ठेवा, होणार अतीवृष्टी

हेही वाचा : महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार! 19 तारखेपर्यंत मुसळधार, हवामान विभागाचा इशारा, ही घ्या खबरदारी

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+