Maharashtra Rain Today राज्यात आज वादळी वाऱ्यांसह होणार पाऊस 'ही' तारीख लक्षात ठेवा, होणार अतीवृष्टी
Maharashtra Rain Today : महाराष्ट्रातील दक्षिण कोकण-गोवातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ताशी ३०-४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे."
राज्यात सोळा ऑगस्टला महत्वाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता मुंबई येथील हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या काळात नागरिकांना दक्षता घ्यावी लागणार आहे.

16 ऑगस्टला अति मुसळधार पाऊस पडणार!
दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये, उत्तर कोकण जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
WARNING FOR 16/08/2025
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 12, 2025
Heavy to very heavy rainfall very likely to occur at few places in the districts of South Konkan-Goa, at isolated places in the districts of North Konkan and in the ghat areas of Madhya Maharashtra.
आज वादळ आणि विजांचा कडकडाट होणार
"कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे.
आज 'या' भागात मुसळधार पाऊस पडणार
"Thunderstorm accompanied with lightning very likely to occur at isolated places in the districts of Konkan, Madhya Maharashtra and Marathwada.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 12, 2025
दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ताशी ३०-४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे."
आज पावसाची कशी असेल स्थिती
१३ ऑगस्ट रोजी कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकटात होऊ शकतो. विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.
१४ ऑगस्टला पावसाची कसा असेल पाऊस
१४ ऑगस्ट रोजी कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या दोन्ही विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भाच बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहेत तर तुरळख ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता आहे.
१५ ऑगस्टला पावसाची कसा असेल पाऊस
१५ ऑगस्टला कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.












Click it and Unblock the Notifications