Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Weather : जोर ओसरला तरी पाऊस झोडपणार! आज पोळ्याच्या दिवशी 'या' जिल्ह्यांत होणार बरसात

Maharashtra Weather Chance of rain in Konkan Mumbai Pune : कोकण, गोव्यात पुढील तीन ते चार दिवस बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस काही ठिकाणी तर त्यापुढे दोन दिवस तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी आणि विदर्भात पुढील तीन ते चार दिवस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Chance of rain in Konkan Mumbai Pune

बैल पोळ्याचा सण महाराष्ट्रात साजरा होत आहे, खांदेमळणी आणि त्यानंतर पोळा असा हा सण आहे, या सणाचे शेतकरी, बैल आणि पावसाचे नातेही खूप अनोखे आहे. सर्वएकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे या दिवशी हमखास पाऊस पडतो असा अनुभव शेतकऱ्यांना आहे. राज्यात हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज बैल पोळ्याच्या दिवशी पाऊस पडणार आहे.

रायगड, रत्नागिरी, साताऱ्यात सरी कोसळणार

आज 22 ऑगस्ट 2025 रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे व साताऱ्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

पुणे आणि इतर परिसरात कसे राहील हवामान?

पुणे व आसपासच्या परिसरात विचार करता आज आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस आकाश सामान्यः ढगाळ राहून हलका ते अती हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा, विदर्भात पाऊस पडणार

आज मराठवाड्यात आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस कोसळणार आहे. यानंतर पुढील तीन ते चार दिवस मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आणि विदर्भात पुढील तीन ते चार दिवस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.

मुंबई हवामान विभागाचा अंदाज काय?

दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस/गडगडाटी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आजपासून पावसाचा जोर कमी

आजपासून मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर कमी होईल, मात्र काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता कायम राहील. तर इतर भाग यामध्ये बहुतांश भागांमध्ये २० ऑगस्टपासून पावसाचा जोर लक्षणीयरीत्या ओसरणार आहे, ज्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत होईल.

हेही वाचा : महाराष्ट्रात का पडतोय मुसळधार पाऊस? 'या' कारणांमुळे वाढला पावसाचा जोर.. आता कधी ओसरणार? वाचा सविस्तर

हेही वाचा : मुंबईत एवढा पाऊस का पडतोय? जाणून घ्या कारणं.. हवामान विभागाची मोठी अपडेट! 'या' भागात पुरांचा धोका

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+