कठीण काळात अजित दादांनी साथ दिली,पक्ष प्रवेशनंतर झिशान सिध्दीकी यांची प्रतिक्रिया
मुंबई ; माजी आमदार, दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे पूत्र झिशान सिद्दीकी यांनी आज सकाळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. महायुतीमध्ये वांद्रे पूर्वची जागेचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुटली आहे.
पक्ष प्रवेश झाल्यानंतर अजित पवार यांनी झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी कॉग्रेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. झिशान सिध्दीकी हे आता महायुतीचे उमेदवार असणार आहेत. महविकास आघाडीकडून शिवसेनेचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

झिशान सिध्दीकी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, 'मी माझ्या वडिलांना गमवलं आहे. अनेक लोकांनी चुकीच्या पध्दतीने राजकारण केलं, माझ्या कठिण काळात अजित पवार, सुनिल तटकरे माझ्यामागे उभे राहिलेत . त्यांनी मला मदत केली. रेकॉर्डब्रेक मतांनी मी विजयी होईल . महाविकास आघाडीने परवाच्या दिवशी आपली उमेदवारी यादी जाहीर केली. त्यावेळी कॉंग्रेसची असलेली वांद्रे पूर्वची जागा उध्दव ठाकरे गटाला दिली. ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. मात्र त्यांनी ढोंगीपणा केला आणि तो आता जनतेच्या समोर आलाय. जनता मला रेकॉर्डब्रेक मतांनी जिंकवेल,असं झिशान सिध्दीकी यांनी म्हटंल आहे.
#WATCH | Mumbai: After joining NCP, Zeeshan Siddiqui says, "Maha Vikas Aghadi declared their candidates and Congress' sitting seat was given to Shiv Sena (UBT), this is very unfortunate. Congress leaders and Maha Vikas Aghadi leaders were in touch with me in the past few… pic.twitter.com/kZBJmmTvx3
— ANI (@ANI) October 25, 2024
वडील बाबा सिद्दिकींसाठी झिशान सिद्दिकींची भावूक पोस्ट
झिशान सिद्दिकी यांनी वडील बाबा सिद्दीकींसाठी काल भावनिक पोस्ट केली आहे. "5 वर्षापूर्वींच्या विधानसभा निवडणुकीच्या निकाला दरम्यानचा एक फोटो शेअर करत बाबा तुमची आठवण येत आहे, अस आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तुमच्या मेहनतीमुळे आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे क्षण शक्य झाले ते या फोटोत कैद झाले होते, बाबा, मला रोज तुमची आठवण येते', असं झिशान सिद्दिकी यांनी आपल्या एक्स या सोशल मिडीया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान 12 ऑक्टोबरच्या रात्री माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे भागात झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांना अटक केली असून मुख्य शूटरसह अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून विविध पैलूंचा तपास सुरू आहे.












Click it and Unblock the Notifications