FDA : महाराष्ट्र आता थांबणार नाही! परकीय गुंतवणूक किती? देवेंद्र फडणवीसांनी सर्वच सांगितलं
Maharashtra tops in foreign direct investment : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा कारभार घेतल्यानंतर आता महाराष्ट्र थांबणार नाही ही थीम घेऊन काम सुरु केले आहे. गेल्या काही काळात महाराष्ट्रातून परकीय उद्योग हातचे गेले, त्यानंतर विरोधकांकडून महायुती सरकारवर जोरदार आरोप झाले. दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राची भरभराट करण्याचा उद्देश असून नवीन उद्योगांचा ओघ येत असल्याची बाब त्यांनी सांगितली आहे.

नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, "पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की, आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे. आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. गेल्या 4 वर्षांतील सरासरी पाहिली तर 1,19,556 कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71 टक्के गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आली आहे."
महाराष्ट्र आता थांबणार नाही!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 3, 2025
वार्षिक सरासरीच्या 95 टक्के
एफडीआय अवघ्या 6 महिन्यात...
पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की, आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे.
आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्या तिमाहीची आकडेवारी आली… pic.twitter.com/D90Q6Ipq9W
"मी महाराष्ट्राचे मन:पूर्वक अभिनंदन करतो"-फडणवीस
देवेंद्र फडणवीसांनी सहकाऱ्यांचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले,"माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देतो."
आकडे बोलतात...!
- 2020-21 : 1,19,734 कोटी
- 2021-22 : 1,14,964 कोटी
- 2022-23 : 1,18,422 कोटी
- 2023-24 : 1,25,101 कोटी
- 2024-25 (एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात) : 1,13,236 कोटी
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल
परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र सातत्याने अग्रेसर राहीला आहे. आताही 2024-25 या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे.
6 महिन्यात वार्षिक सरासरीच्या 95 टक्के गुंतवणूक
गेल्या चार वर्षातील वार्षिक गुंतवणुकीची सरासरी पाहता चालू आर्थिक वर्षातील सहा महिन्यातच महाराष्ट्राने एकूण 94.71 टक्के गुंतवणूक आकर्षित केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या समाज माध्यमात पोस्ट करत दिली. गेल्या चार वर्षांतील सरासरी पाहिली तर दरवर्षी 1 लाख 19 हजार 556 कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. यंदा सहा महिन्यात 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71 टक्के गुंतवणूक ही फक्त सहा महिन्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications