Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

देशी गाईसाठी विशेष अनुदान, कोतवालांच्या मानधनात वाढ, वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील 38 निर्णय!

Maharashtra State Cabinet Meeting : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे फडणवीस सरकारच्या वतीने निर्णय घेण्यात कोणतीच कसूर केली जात नाही. सोमवारी दि.30 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. यात प्रामुख्याने देशी गाईच्या संवर्धनासाठी विशेष अनुदान जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.

तसेच मराठा आरक्षणाच्या दृष्टीने देखील मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. दुसरीकडे कोतवालांच्या मानधनात देखील वाढ करण्यात आली आहे. सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये तब्बल 38 निर्णय घेण्यात आलेले आहेत. आचारसंहिता तोंडावर असताना सरकारने अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतल्याचं दिसतंय.

Maharashtra State Cabinet Meeting

मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले निर्णय

  • कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ, अनुकंपा धोरणाही लागू (महसूल विभाग)
  • ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान (नियोजन विभाग)
  • ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार.
  • एमएमआरडीए ला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली. (नगर विकास विभाग)
  • ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार.
  • १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता (नगर विकास विभाग)
  • ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार (नगर विकास विभाग)
  • देशी गाईच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना. (पशुसंवर्धन विभाग)
  • भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा देण्यात आली असून नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार (क्रीडा विभाग)
  • रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा (महसूल विभाग)
  • राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार. जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार (जलसंपदा विभाग)
  • जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता. ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार (जलसंपदा विभाग)
  • लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा, पेठ, कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता (जलसंपदा विभाग)
  • धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन (महसूल विभाग)
  • रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार.
  • एमएमआरडीए ला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत (नगर विकास विभाग)
  • केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार. दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार (गृहनिर्माण विभाग)
  • पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासक (बंदरे विभाग)
  • धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना. धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी (गृहनिर्माण विभाग).
  • सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख (वित्त विभाग)
  • अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले
  • अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होणार (कृषी विभाग)
  • सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ (इतर मागास बहुजन कल्याण)
  • जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूत गिरणीला अर्थसहाय्य करणार (इतर मागास बहुजन कल्याण)
  • राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ. सुमारे ४० हजार होमगार्डना लाभ (गृह विभाग)
  • नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार (वैद्यकीय शिक्षण)
  • आयुर्वेद, युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती (वैद्यकीय शिक्षण)
  • राज्यातील आणखी २६ आयटीआय संस्थांचे नामकरण (कौशल्य विकास).
  • आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ (नियोजन विभाग)
  • श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून १५ (विधी व न्याय विभाग)
  • अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित (सामान्य प्रशासन विभाग)
  • बार्टीच्या धरतीवर वनार्टी स्वायत्त संस्था (इतर मागास बहुजन कल्याण)
  • मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत (महसूल विभाग)
  • जिल्हा परिषदेतील २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय (ग्रामविकास विभाग)
  • पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार (उद्योग विभाग)
  • राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती. ४८६० पदे (शालेय शिक्षण)
  • शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय. हमी शुल्क माफी मिळणार नाही (वित्त विभाग)
  • अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा. जनजागृतीवर भर ( वैद्यकीय शिक्षण विभाग)
  • माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला ( सामान्य प्रशासन विभाग)
  • राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण. (शालेय शिक्षण)
  • डाळिंब, सीताफळ इस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ (कृषी विभाग)
  • महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा (महसूल विभाग)

शिंदे समितीचा दुसरा व तिसरा अहवाल स्वीकारला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 38 निर्णयांना मंजुरी देण्यात आली. त्यात मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात असलेला सर्वात महत्वाचा निर्णयाकडे राज्याचे लक्ष होते. यासंदर्भात नेमलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने त्यांचा दुसरा अन् तिसरा अहवाल सरकारकडे दिला होता. हा अहवाल स्वीकारण्यात आला आहे.

हैदराबाद गॅझेटचं काय?

शिंदे समितीने अहवाल सादर केला आहे, मात्र तो नेमका कुठला आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाही. हैदराबाद गॅझेट लागू करावं, अशी जरांगेंची मागणी आहे. त्यासाठी मंत्री शंभुराज देसाई यांनी जरांगेंना शब्दही दिला होता. त्यानुसार समितीने हैदराबाद येथे जाऊन कागदपत्र तपासल्याची माहिती आहे. सोमवारी सादर केलेल्या अहवालामध्ये हैदराबाद गॅझेटचा समावेश आहे की नाही? हे स्पष्ट नाही.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+