Maharashtra State Cabinet Meeting : सरपंच-उपसरपंचांच्या मानधनात दुपटीने वाढ, 14 ITI चे नामांतर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यात प्रामुख्याने राज्यातील सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे.
याशिवाय राज्यातील विविध जिल्ह्यात असलेल्या 14 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आयटीआय यांचे नामांतर करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

14 ITI चा नामांतराचा निर्णय
शासनाने आज घेतलेल्या निर्णयामध्ये 14 आयटीआय यांचे नामांतर करुन समाजात योगदान देणाऱ्या 14 व्यक्तींची नावे देखील या आयटीआय संस्थेसाठी देऊ केली आहेत. त्यामध्ये, ठाणे जिल्ह्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात आले आहे. तर, बीडमधील आयटीआयला दिवंगत नेते विनायक मेटे यांचं नाव देण्यात आलं आहे.
राज्यातील 14 आयटीआयचे नामांतर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडलळाच्या बैठकीत घेण्यात आला असून कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या खात्याने हा निर्णय घेतला आहे. या आयटीआय कॉलेजेसला नाव देताना सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार करण्यात आल्याचे दिसून येते.
नेमकं कुठल्या आयटीआयला कुणाचं नाव?
सध्याचे नाव - नव्याने करावयाचे नामकरण
o1. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे = धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था
02. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई = भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
03. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि. अहमदनगर = पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
04. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड = कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
05. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर. = भगवान बिरसा मुंडा औद्योगिक प्रशिक्षण संस्था
06. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, जि.नाशिक = पालघर महात्मा ज्योतिबा फुले औद्योगिक प्रशिक्षण संस्था
07. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर = राजर्षी शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था
08. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती = संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती.
09. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली = लोकशाहीर आण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था
10. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव = कवयत्री बहिणाबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव
11. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा = दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा.
12. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई. = दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई.
13. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई. = महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई
14. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव = आचार्य विदयासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव.












Click it and Unblock the Notifications