Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Rain : बप्पा पाऊस घेऊन येणार! राज्यात या भागात आज मेघगर्जना विजांचा कडकडाटासह सरी बरसणार

Maharashtra Rain Today : राज्यात ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला असून महाराष्ट्रात पुढील तीन दिवस चांगला पाऊस होणार आहे, आज २६ ऑगस्टला हरितालिकेच्या दिवशीही महाराष्ट्रातील विदर्भासह ९ जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. अन् उद्या गणपती बप्पाचे आगमन होणार आहे, त्यामुळे बप्पांचे आगमनही पावसातच होणार आहे.

Maharashtra Rain

विदर्भासह 9 जिल्ह्यांना येलो अलर्ट!

महाराष्ट्रासाठी पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. त्यानुसार, राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.तर कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रातही पाऊस अपेक्षित आहे. चला विभाग-जिल्हानिहाय जाणून घेऊया, आजपासून तीन दिवसांचा हवामान अंदाज.

१. कोकण आणि गोवा

पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोव्यातही पाऊस पडेल अशी शक्यता आहे.

२. मध्य महाराष्ट्र

धुळे, नंदुरबार, जळगाव: या जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल आणि सोसाट्याचा वारा वाहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नाशिक: आज नाशिक जिल्ह्यात व घाट विभागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडेल.

पुणे व सातारा: या जिल्ह्यांमधील घाट विभागात पुढील दोन ते तीन दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुणे परिसर: पुणे आणि आसपासच्या भागात पुढील तीन ते चार दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून अति हलका ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

३. मराठवाडा

हिंगोली व नांदेड: या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहील. येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो.

४. विदर्भ

विदर्भात आज काही ठिकाणी पाऊस पडेल आणि पुढील दोन दिवसांत अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस विदर्भातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता आहे.

हवामान इशारा: 'यलो अलर्ट' जारी

मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रातील सर्व 9 जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यांतील नागरिकांनी पाऊस आणि विजांसंबंधीत सावधगिरी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी लागणार आहे.

टीप: हा हवामान अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (IMD) मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. हवामानामध्ये बदल होण्याची शक्यता असल्याने नवीनतम माहितीसाठी अधिकृत स्त्रोतांचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+