Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra rain : राज्यात आज या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होणार, जाणून घ्या हवामान अंदाज

Maharashtra rain forecast today : राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला असून आजचा दिवस सुरु होताच छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यात पाऊस झाला. दरम्यान, आज दिवसभरात दक्षिण कोकण-गोवा आणि उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस, ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात कसा पाऊस पडणार हे जाणून घेऊया, यासह आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाजही जाणून घेणार आहोत.

Maharashtra rain forecast today


कोकणात आज पावसाची स्थिती काय

कोकणात आज बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात कसा पडणार पाऊस

आज मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्रात कसा असेल पाऊस?

दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस, ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात कशी राहील पावासाची स्थिती

मराठवाड्यात आज काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

विदर्भात पावसाची स्थिती कशी राहील?

आज विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. तर तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होऊ शकते.

११ ते १५ ऑगस्टपर्यंत कशी राहील स्थिती?

राज्यात ११ ऑगस्टला कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तर तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होऊ शकते.

१२ ऑगस्टला पावसाची कसा असेल पाऊस

१२ ऑगस्ट रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.

विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेनुसार विजांचा कडकडाट होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

१३ ऑगस्टला पावसाची कसा असेल पाऊस

१३ ऑगस्ट रोजी कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकटात होऊ शकतो. विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.

१४ ऑगस्टला पावसाची कसा असेल पाऊस

१४ ऑगस्ट रोजी कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या दोन्ही विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भाच बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहेत तर तुरळख ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता आहे.

१५ ऑगस्टला पावसाची कसा असेल पाऊस

१५ ऑगस्टला कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+