Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोलापुरात अजब पेच! "धनुष्यबाणाला मतदान करू नका"; एकनाथ शिंदेंच्या विधानाने खळबळ, नेमकं काय घडलं?

Eknath Shinde on Bow Arrow Symbol Controversy : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशा काही घटना घडत आहेत, ज्याची कल्पना करणेही कठीण आहे. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत काल असाच एक अजब राजकीय पेच पाहायला मिळाला.

चक्क राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाच्या 'धनुष्यबाण' चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला मतदान न करण्याचे आवाहन भरसभेत केले. या धक्क्यातून मतदार सावरत नाहीत तोच, विरोधक आमदार चक्क शिंदेंच्या मंचावर दिसल्याने सोलापूरच्या राजकारणात 'काहीही घडू शकते' याची प्रचिती आली.

Don   t Vote for Bow Arrow Candidate   Eknath Shinde

"धनुष्यबाणाला मत देऊ नका"; नेमकं प्रकरण काय?

मोहोळ तालुक्यातील नरखेड पंचायत समिती गणात महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र होते. येथे शिवसेनेकडून ज्योत्स्ना पाटील यांनी धनुष्यबाण चिन्हावर अधिकृत अर्ज भरला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून प्रगती दगडे रिंगणात आहेत. युती असूनही दोन उमेदवार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता.

काल सभेत बोलताना स्थानिक नेत्याने एक चिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "नरखेड गटात ज्योत्स्ना पाटील या आपल्या अधिकृत उमेदवार नाहीत. येथे महायुतीचा धर्म पाळला गेला पाहिजे. शिवसेनेच्या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला मत देऊ नका." आपल्याच पक्षप्रमुखांनी स्वतःच्या चिन्हाविरोधात भूमिका घेतल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

ज्योत्स्ना पाटील यांचा पत्ता का कट झाला?

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी या प्रकरणाचा उलगडा केला. त्यांच्या मते, ज्योत्स्ना पाटील या मूळच्या भाजप नेते राजन पाटील यांच्या कार्यकर्त्या आहेत. पक्षाने त्यांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना देऊनही त्यांनी त्या पाळल्या नाहीत. अखेर 'महायुती' टिकवण्यासाठी शिंदेंनी राष्ट्रवादीच्या प्रगती दगडे यांना पाठिंबा जाहीर केला.

बार्शीत राजकीय भूकंप: दिलीप सोपलांना खुली ऑफर

एकनाथ शिंदेंचा हा दौरा केवळ विधानांमुळेच नव्हे, तर व्यासपीठावरील उपस्थितीमुळेही गाजला. बार्शीमध्ये ठाकरे गटाचे ज्येष्ठ आमदार दिलीप सोपल यांनी चक्क शिंदेंच्या व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी शिंदेंनी त्यांना मंचावरूनच थेट शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली. सोपल यांच्या उपस्थितीमुळे बार्शीत लवकरच मोठा राजकीय बदल होण्याची चिन्हे आहेत.

मोहोळमध्ये राजकीय सीमा धूसर

मोहोळमध्येही प्रोटोकॉलला फाटा देत शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंचे स्वागत केले. निवडणुकीच्या तोंडावर विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमधील ही जवळीक पाहून मतदार मात्र चक्रावून गेले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+