Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नागपुर अधिवेशनाचा दुसरा दिवस : विधानपरिषदेच्या सभापतीसाठी 19 नोव्हेंबरला होणार निवडणूक

Nagpur Winter Session Latest Update Live : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. काल पहिल्याच दिवशी शोक प्रस्ताव असल्याने कोणतीही चर्च झाली नाही. मात्र, विधान परिषदेमध्ये बीड येथील हत्येप्रकरणी तसेच विधानसभेमध्ये परभणी येथील घटनेवर विरोधकांनी मुद्दा उपस्थित केला. तर आज दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीलाच विरोधकांनी बीड व परभणी घटनेवरुन सरकारला धारेवर धरत आजच चर्चेची मागणी केली. त्याला विरोध झाल्याने अखेर विरोधकांनी सभात्याग केला आहे.

Nagpur Winter Session 2024

2:32 PM, 17 Dec

Nagpur Winter Session Live : विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी 19 डिसेंबरला निवडणूक

मागील दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेच्या सभापतीची निवडणूक 19 डिसेंबरला होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभाती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात ही घोषणा केली. सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनातच सभापती निवडला जाणार असल्याचे आधीच बोलले जात होते. त्यानुसार आता ही निवडणूक होणार आहे. वास्तविक रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत ऑगस्ट 2022 मध्ये संपल्यापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. मात्र, आगामी राजकारणाच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचे असल्याने ते भरले जाईल, असे सांगितले जात होते. या विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीत चुरस असणार आहे. हे अपेक्षितच आहे. वास्तविक या पदावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे भाजपकडे आहे. तर विधान परिषदेचे उपसभातीपद हे शिवसेनेकडे आहे. त्यामुळे या पदावर राष्ट्रवादीचाच सदस्य निवडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
12:59 PM, 17 Dec

Nagpur Winter Session Live : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची परिषद सभागृहात मागणी

Nagpur Winter Session Live : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची परिषद सभागृहात मागणी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहराचे राज्य शासनाच्या वतीने नामांतरण करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या परवानगीने सदरील नामांतरण झाले आहे.मात्र,अद्यापपर्यंत शहरातील रेल्वेस्टेशन व विमानतळावर छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख होत नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशन व विमानतळावर छत्रपती संभाजीनगरचा नामोल्लेख करावा,अशी मागणी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात केली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ व कृषी उत्पन्न बाजार समिती या स्थानिक संस्थावर सुद्धा छत्रपती संभाजीनगर असा नामोल्लेख होत नसल्याचे दानवे यांनी निदर्शनास आणून दिले. धाराशिव व अहिल्यानगरचे सुद्धा नुकतेच नामांतरण झाले आहे. येथील स्थानिक संस्थांवरही नव्या नावाचा नामोल्लेख करण्यात यावा,अशीही मागणी दानवे यांनी केली. उत्तर प्रदेशातील फैझाबादचे एका रात्रीत आयोध्या असे नामांतरण झाले. मात्र राज्यात संभाजीनगर, धाराशिव व अहिल्यानगर यांचे नामांतर होऊन मोठा कालावधी गेला आहे. तरीही अद्यापपर्यंत येथील स्थानिक संस्थांवर नवीन नावाप्रमाणे उल्लेख का होत नाही ? असा प्रश्न देखील अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.
12:57 PM, 17 Dec

Nagpur Winter Session Live : महायुती सुसाट, आरोपी मोकाट; महाविकास आघाडीचा आरोप

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा व परभणी येथील संविधानाच्या प्रतीच्या विटंबनेच्या घटनेचा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला. विधिमंडळ अधिवेशनेच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ सभागृहाच्या पायऱ्यांवर महाविकासागरच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. महायुती सुसाट, आरोपी मोकाट व अटक करा, अटक करा बीडच्या गुन्हेगारांना अटक करा अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. राज्य सरकारच्या दडपशाहीमुळे संविधानाच्या विटंबनाविरोधात लढाई लढत असलेल्या दलित समाजातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणांचा मृत्यू झाला असून शासनाने केलेली ही हत्या असल्याची, गंभीर टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केली.
11:51 AM, 17 Dec

Nagpur Winter Session Live : पाहा वनइंडिया मराठी युट्यूब चॅनेलवर लाईव्ह

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. त्याचे अपडेट्स तुम्ही वनइंडिया मराठी युट्यूब चॅनेलवर देखील लाईव्ह जाणून घेऊ शकता.
11:45 AM, 17 Dec

Nagpur Winter Sessin Live : आजच चर्चा करण्याची विरोधकांची मागणी

परभणी प्रकरणात चर्चा आजच घेण्याची मागणी नाना पटोले यांनी केली आहे. मात्र, अध्यक्षांनी उद्या नियम 101 अंतर्गत चर्चा होणार असल्याचे जाहीर केले. मात्र, विरोधकांच्या वतीने आजच चर्चा घेण्याची मागणी केली जात आहे. या संदर्भात सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न विरोधकांच्या वतीने केला जात आहे.
11:24 AM, 17 Dec

nagpur winter session Live : विरोधकांचा सभात्याग

परभणी आणि बीड मधील घटनेवरुन चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात आली. मात्र, या विषयावर उद्या चर्चा होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. मात्र, विरोधकांनी आजच चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, सरकारने आज चर्चा करण्यास नकार दिला. त्यावरुन अखेर विरोधक सभात्याग करत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. त्यानंतर विरोध पक्षातील सर्व आमदारांनी सभात्याग केला.
11:23 AM, 17 Dec

nagpur winter session Live : आमदार क्षीरसागर यांचा जोरदार हल्लाबोल

बीड मधील खून प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर यांनी औचीत्याचा मुद्दा उपस्थित केला. यात क्षीरसागर यांनी वाल्मीक कराड यांचा उल्लेख केला. या प्रकरणात मोबाईलचे रेकॉर्ड तपास करण्याचे आवाहन देखील त्यांनी केला. इतकेच नाही तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद घ्यावे, तसेच येथील गुन्हेगारीकडे लक्ष देण्याची मागणी देखील क्षीरसागर यांनी केली.
11:21 AM, 17 Dec

Nagpur Winter Session Live : सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालतेय - अंबादास दानवे

परभणीतील व्यक्तीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला आहे. तर बीडमध्ये सत्ताधारी लोकांच्या माध्यमातूनच सरपंचांचा खून झाला असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बीडमधील घटनेत धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता वाल्मीक कराड हा सहभागी असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+