Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मनपा निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात! 'या' तारख 5 लक्षात ठेवा, मोठ्या राजकीय घडमोडी वाचा

Maharashtra Municipal Election 2025 Nomination Starts Today Full Schedule : महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून आजपासून (२३ डिसेंबर २०२५) उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीमुळे राज्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापले असून सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्या धर्तीवर राजकीय पक्षांच्या रणनितीच्या घडामोडी आणि हालचाली वाढल्या आहेत.

Maharashtra Municipal Election 2025

निवडणूक कार्यक्रम असा..

  • उमेदवारी दाखल : 23 ते 30 डिसेंबर 2025
  • उमेदवार अर्जांची छाननी : 31 डिसेंबर 2025
  • उमेदवारी मागे घेण्याची मुदत : 2 जानेवारी 2026
  • निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी : 3 जानेवारी 2026
  • मतदान : 15 जानेवारी 2026
  • मतमोजणी : 16 जानेवारी 2026

29 महापालिकांत 2869 जागा

  • एकूण महानगर पालिका - २९
  • एकूण जागा - २,८६९ जागांसाठी
  • महिला - १, ४४२
  • अनुसूचित जाती - ३४१
  • अनूसूचित जमाती - ७७
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग - ७५९

या निवडणुकीतील ५ महत्त्वाच्या राजकीय घडमोडी

१. अजित पवारांचे बगावती तेवर

नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी भाजपच्या कट्टर विरोधी पक्षांशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. यामुळे महायुतीत पुन्हा एकदा जागावाटपावरून ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

२. जागावाटपाचा पेच

महाविकास आघाडी (MVA) आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये मुंबई, पुणे आणि नाशिकसारख्या मोठ्या शहरांमधील जागावाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. मित्रपक्षांमध्ये 'एबी फॉर्म'वरून रस्सीखेच सुरू आहे.

३. बंडखोरांची भीती

अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी पक्षाने तिकीट नाकारल्यास अपक्ष लढण्याची तयारी इच्छुकांनी दर्शवली आहे. ही बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान पक्षप्रमुखांसमोर असेल.

४. नवे चेहरे आणि घराणेशाही

यावेळेस अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या मुला-मुलींना राजकारणात लाँच करण्यासाठी महानगरपालिकेच्या रिंगणात उतरवले आहे. दुसरीकडे, पक्षांनी तरुणांना संधी देण्याचे आश्वासन दिले आहे.

५. ठाकरे बंधू एकत्र येणार?

राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सर्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांतील काही प्रमुख नेत्यांनी 'मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी' दोन्ही भावांनी एकत्र यावे किंवा किमान निवडणुकीत छुपी युती करावी, यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीका करण्याचे टाळल्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे. जर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते एकत्र आले, तर मुंबई आणि ठाण्यासारख्या महत्त्वाच्या महापालिकांचे चित्र पूर्णपणे बदलू शकते. त्यामुळे आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी, 'युती'बाबत काय चमत्कार होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+