महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका कधी व किती टप्प्यात होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर
Maharashtra Local Body Elections 2025 : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाकडून केली जात आहे. तर दुसरीकडे, निवडणुकीच्या तयारीला सर्वच यंत्रणा लागली आहे. परंतु निवडणुका नक्की कधी होणार याची याची उत्सुकता सर्वांना लागून आहे. याबाबत महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच निवडणूक आयोगाकडून कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची रणधुमाळी दिवाळीपूर्वी फुटणार की दिवाळीनंतर याची उत्सुकता आहे. त्यातच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

निवडणूक आयोगाकडून लवकरच वेळापत्रक जाहीर होणार!
राज्यातील निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. निवडणूक आयोग 4 टप्प्यात निवडणुका घेणार असल्याचे समजते. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक महत्त्वाच्या शहरांत, जिल्ह्यांत पडद्यामागे विविध पक्षाच्या वतीने राजकीय घडामोडी सुरू आहेत. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी प्रत्येक आघाडी आता कामाला लागली आहे.
दरम्यान, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील अनेक महापालिकांमध्ये 2, 3 तर काही ठिकाणी 5 वर्षांपासून प्रशासनाकडून कारभार चालवला जातोय. निवडणुका न झाल्यामुळे तिथे सध्या प्रशासनाच्या अख्यत्यारित कामकाज सुरु आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने 2022 आधीचं आरक्षण कायम ठेवायचा आदेश देत निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले. त्यानंतर निवडणूक आयोग तयारीला लागले आहे.
या महिन्यात होणार मतदान?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या चार टप्प्यात होणार असल्याची चर्चा आहे. तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती मिळत आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका या वेगवेगळ्या होणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रभाग रचनेचं काम सुरु आहे.
निवडणूक आयोगाकडून लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वेळापत्रक जारी केलं जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग त्यासाठीच तयारी करत आहे.
याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. निवडणूक आयोगाकडून याबाबत अधिकृत घोषणा केल्यानंतरही सर्व स्पष्ट होईल. पण याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत.












Click it and Unblock the Notifications